गाजरमध्ये असलेल्या पोषकतत्वं जसं तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, तसंच वजन कमी करण्यासाठी देखील गाजराचा डाएटमध्ये समावेश केला जातो. बहुगुणी असलेल्या गाजराच्या सेवनाने रक्तातील हिमोग्लोबीनची मात्रा वाढण्यासाठी मदत करतं. बाजारात नारंगी रंगाचं गाजर सहज उपलब्ध होतं मात्र जर तुम्ही काळ्या रंगाच्या सेवन केलं तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन कमी करण्यास फायदेशीर 
काळ्या रंगाचं गाजर सहसा बाजारात फार कमी प्रमाणात मिळत असलं तरी फुड मॉलमध्ये किंवा ऑनलाईन उपलब्ध होतं. काळ्या रंगांचं गाजर आरोग्यासाठी गुणकारी मानलं जातं. असं म्हणतात की, काळ्या रंगांच्या गाजरामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. इतर गाजरांच्या तुलनेत काळ्या रंगांच्या गाजराच्या सेवनाने झटपच वजन कमी करण्यास मदत होते. तुम्ही सलाडमध्ये याचा समावेश करु शकता. त्याशिवाय तुम्ही काळ्या रंगांच्या गाजराचा ज्युस प्यायल्याने बराच काळ पोट भरलेलं राहतं. 



डोळ्यांसाठी फायदेशीर 
काळ्या रंगाच्या गाजरामध्ये व्हिटॅमीन ए,सी आणि ई मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काळ्या रंगांच्या गाजरामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांना अनियमित मासिक पाळी आणि अतिरिक्त रक्तस्राव यांमुळे शरीरातील हिमोग्लोबीनची मात्रा कमी होते. याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर ही होतो. त्यामुळे महिलांनी काळ्या रंगांच्या गाजराचं सेवन केल्याने नजरदोष किंवा वाढलेला चष्म्याचा नंबर देखील कमी होतो. 



बद्धकोष्ठतेपासून सुटका 
चमचमीत पदार्थ आणि अतिरिक्त तेलकट खाल्ल्याने शरीरात उष्णतेचं प्रमाण वाढतं त्यामुळे पोट साफ होताना आग होणं. रक्त पडणं या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.तुम्हला ही जर बद्धकोष्ठतेचा त्रास वारंवार होत असेल तर काळ्या रंगाचं गाजर खाणं फायदेशीर ठरतं.काळ्या रंगाच्या गाजरामुळे पोट साफ होण्यास मदत होते.  


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)