सर्दी, खोकला आणि पाईल्सवर काळी मिरी रामबाण उपाय
काळी मिरीची ओळख तशी फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून आहे. पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.
मुंबई : काळी मिरीची ओळख तशी फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून आहे. पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.
काळी मिरीमध्ये अनेक औषधीय गुण आहेत. ज्याचा अनेक समस्यांवर उपाय म्हणून वापर केला जाऊ शकतो.
डोळ्यांची नजर
काळी मिरी नियमित आहारात खाल्याने डोळ्यांची नजर चांगली होती. ज्यांना चष्मा आहे किंवा जे लोकं रोज कंप्यूटरवर काम करतात. अशा व्यक्तींनी अर्धा समचा काळी मिरी वाटून थोडं तूप टाकून रोज सकाळी आणि संध्याकाळी खालली पाहिजे. ज्यामुळे डोळ्याची नजर चांगली होते.
पोटात जंत
पोटामध्ये जर जंत होत असतील तर काळी मिरी यावर चांगला उपाय आहे. काळी मिरी बारीक करुन 2-3 वेळा चावून खाल्याने किंवा ताकात याची पावडर टाकून पिल्याने पोटातील जंत नाहीसे होतात.
सर्दी
काळी मिरी सर्दीसाठी देखील लाभदायक आहे. गरम दूधमध्ये काळी मिरी टाकून प्यायल्याने आराम मिळतो. असं अनेक दिवस केल्याने सर्दी पूर्णपणे नाहीशी होते.
खोकला
खोकला येत असेल तरी सुद्धा काळी मिरी लाभदायक ठरते. अर्धा चमचा काळी मिरीची पूड आणइ अर्धा चमचा मध एकत्र करुन खाल्याने खोकला दूर होतो.
गॅसची समस्या
गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय आहे. एक कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमच लिंबूचा रस टाकावा त्यानंतर अर्धा चमच काळी मिरीची पूड आणि अर्धा चमचा काळं मीठ काही दिवस सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.
पाईल्स
पाईल्सच्या समस्येवर देखील काळी मिरी फायदेशीर ठरते. काळी मिरी 20 ग्रॅम, जीरा 10 ग्रॅम आणि साखर यांचं मिश्रण 15 ग्रॅम कुटुन एकत्र करावं. हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ एकत्र करुन घेतल्याने पाईल्सचा त्रास कमी होतो.