Blood Group Diet And Food List: फीट आणि फाईन असावं, हे प्रत्येकाला वाटतं. निरोगी राहण्यासाठी योग्य आहार ( Healthy Diet ) घेतला पाहिजे, असा सल्ला नेहमी तज्ज्ञांकडून दिला जातो. मात्र निरोगी राहण्यासाठी नेमका कसा आहार घेतला पाहिजे, याची अनेकांना माहिती नसते. पण यामध्ये आता तुम्हाला तुमचा ब्लड ग्रुप ( Blood Group Diet ) मदत करू शकणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहितीये का, योग्य डाएट निवडण्यासाठी तुम्हाला तुमचा ब्लडग्रुप मदत करू शकतो. यामुळे तुम्ही फीट राहू शकता. तुमच्या रक्तगटानुसार, कसा आहार घेतला पाहिजे, हे जाणून घेऊया.


ए ब्लड ग्रुप 


जर तुमचा रक्तगट ए असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची अधिक काळजी घेतली पाहिजे. रक्तगट ए असलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती फार संवेदनशील असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या व्यक्तींनी कमी चरबीयुक्त आहार घेतला पाहिजे. याशिवाय तुमच्या आहारामध्ये तांदूळ, राई, भोपळा, शेंगदाणे, सोया फूड, अक्रोड, मनुका, गहू यांचा समावेश करा. त्याचप्रमाणे ग्रीन टी पिण्यावर भर द्यावा. 


एबी ब्लड ग्रुप


जर तुमचा ब्ल ग्रुप एबी असेल तर तुम्ही रेड मीट म्हणजेच लाल मांस खाणं टाळलं पाहिजे. या व्यक्तींनी मासे, मांस भाज्या, कार्ब्स, दूध, दही तसंच दुग्धजन्य पदार्थ अनुकूल ठरतात. याशिवाय अधिक प्रोटीन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. या गोष्टींचा आहारात समावेश करणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. मुख्य म्हणजे हा रक्तगट असलेल्या व्यक्ती मिश्र प्रकारचा आहार घेऊ शकतात.


ओ ब्लड ग्रुप


ओ रक्तगट हा फार महत्त्वाचा मानला जातोय. ज्या व्यक्तींचा ब्लड ग्रुप ओ असतो त्यांनी त्यांच्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश केला पाहिजे. यामध्ये तुम्ही आहारात मांस, अंडी, मासे यांचा समावेश करावा. याशिवाय धान्य आणि सोयाबीनसह शेंगांचं प्रमाण संतुलित ठेवलं पाहिजे. या प्रकारचा आहार घेतल्याने तुम्ही निरोगी राहण्यास मदत होईल.


बी ब्लड ग्रुप 


बी रक्तगट असलेल्या लोकांनी आहारामध्ये काही पदार्थ घेणं टाळलं पाहिजे. यामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ, कोबी, कॉर्न, शेंगदाणे तसंच पॅकेज फूड खाणं बी ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींनी टाळावं. मुळात या व्यक्ती विविध प्रकारचा पदार्थ आहारात समाविष्य करू शकतात. यामध्ये मांस, भाज्या, धान्ये यांचा समावेश आहारात करावा. याशिवाय जर या व्यक्तींनी एका दिवसभरात मांस खाल्ले असेल तर संध्याकाळी भाज्या वगैरे खाण्यावर भर दिला पाहिजे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)