मुंबई : मुलांच्या जशा काही सवयी मुलींना आवडत नाहीत. त्याचप्रमाणे मुलींच्याही काही सवयी मुलांना भावत नाहीत. तुम्हाला माहित आहेत का या सवयी? मुलींच्या या सवयी मुलांना फक्त आवडतच नाही असे नाही तर त्यामुळे मुले चिडतातही. मुलींच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या मुलांना अजिबात आवडत नाहीत. या जाणून घेऊया... त्यानंतर तुम्हाला तर नाहीत ना या सवयी हे तपासून पहा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. प्रत्येक वेळेस स्वतःची मनमानी करण्याची सवय पुरुषांना अजिबात आवडत नाही. पुरुषाच्या जीवनावर पूर्णतः ताबा मिळवणारी मुलगी मुलांना भावत नाही.


२. पार्टीत किंवा डेटवर खाण्यासाठी काही मुली लाजतात. मुलींची खायला लाजण्याची सवय पुरुषांना आवडत नाही.


३. पुरुषांना जास्त मेकअप केलेला आवडत नाही. पुरुषांना मुलींचा साधा सिंपल लूक भावतो. खूप मेकअप भपका त्यांना रुचत नाही.


४. मुली खूप बोलतात, हे सर्वांनाच माहित आहे. मुलींची बडबड मुलांना आवडत असली तरी काही वेळेस त्यांना अति बडबडीचा त्रास होतो. मुलांचे बोलणे न ऐकता स्वतःची बडबड करणाऱ्या मुलींचा त्यांना राग येतो.


५. डेट वर असताना किंवा एकत्र असताना बॉयफ्रेंडकडे लक्ष न देता मोबाईलमध्ये व्यस्त असणाऱ्या मुली मुलांना अजिबात आवडत नाहीत.