नवी दिल्ली : दिल्लीच्या रूग्णालयात कर्करोगाचा असा एक प्रकार उघडकीस आला आहे, जो ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. दिल्लीच्या पडपरगंजमधील मॅक्स रूग्णालयात स्तन कर्करोग झालेल्या एका व्यक्तीवर उपचार करण्यात आला आहे. यावरून असं स्पष्ट होतं की स्तन कर्करोग हा जीवघेणा आजार फक्त महिलांच नाही तर पुरूषांना देखील होवू शकतो. स्तन कर्करोग हा ८३३ पैकी फक्त एका व्यक्तीला होण्याची शक्यता असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हा जीवघेणा आजार अलिगडमध्ये राहणाऱ्या ५३ वर्षीय चंद्र मोहन गोयल यांना झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूस एक गाढ आठळून आली. कालांतराने ही गाढ वाढत असल्याचे निदर्शनास आले. 


अखेर एप्रिल २०१९ मध्ये त्यांना स्तन कर्करोग झाल्यांचं निदान लागलं. चंद्र मोहन यांना उच्च रक्त दाबाची देखील समस्या होती. ज्यामुळे त्यांना अधिक त्रास होत होता. जेव्हा ते उपचारासाठी दिल्लीत दाखल झाले. तेव्हा त्यांचा कर्करोग दुसऱ्या स्तरावर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.


किमोथेरेपीच्या सेशन्स नंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्तन कर्करोग सामान्यत: महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. पण आता हा आजार पुरूषांना देखील होण्याची शक्यता आहे. परंतु समाजात याबद्दल जागृतता पसरवण्यासाठी चंद्र मोहन आपली ओळख न लपवता खुद्द समोर आले आहेत.


मॅक्स रूग्णालयाच्या डॉ. मीनू वालिया यांच्या सांगण्यानुसार पुरूणांमध्ये होणाऱ्या स्तन कर्करोगावर उपचार शक्य आहेत. परंतु वेळेत या आजाराचे निदान लागणं गरजेचं आहे.