मुंबई : जगात असे अनेक बॉडीबिल्डर्स आहेत जे खूप वर्कआऊट करतात आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. बॉडी बनवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वजन उचलण्याच्या बाबतीत त्यांच्यात स्पर्धा लागलेली असते. पण या दरम्यान अनेकांना गंभीर दुखापतही होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2021 मध्ये ब्रिटीश बॉडीबिल्डरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो बारबेलमध्ये प्लेट्स टाकून 220 किलो वजनाचा बेंच प्रेस व्यायाम करत होता. व्यायाम करत असताना त्याचे संतुलन बिघडले आणि उजव्या छातीच्या बाजुचे स्नायू ब्रेक झाले. त्या व्हिडीओने सगळ्यांनाच थक्क केले.



काही काळापूर्वी या बॉडीबिल्डरने त्याच्या रिकव्हरी प्रक्रियेबद्दल सांगितले होते आणि 30 किलो वजनाचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला होता. 


कोण आहे हा बॉडीबिल्डर?


या ब्रिटिश बॉडीबिल्डरचे नाव रायन क्रॉली असून त्याचा जन्म हॅम्पशायरमध्ये झाला होता. वयाच्या 16 व्या वर्षापासून तो बॉडी बिल्डिंग करत आहे. मार्च 2021 मध्ये तो जिममध्ये 220 किलो बेंच प्रेस करत होता. त्याच वेळी एक धक्कादायक घटना घडली. जगभरात लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि शेअर केला.