दररोज 10 हजार पाऊले चालणे आणि वर्कआऊट एक सारखंच आहे का? तज्ज्ञ काय सांगतात
10K Steps A Day : हल्ली लोकं वर्कआऊट करण्याऐवजी स्मार्टवॉचमध्ये किती पाऊले चाललो हे मोजतात. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया या दोन्हींमध्ये काय फरक.
Walking Health Benefits : पर्सनल लाईफ आणि ऑफिसचं काम मॅनेज करताना प्रत्येकाचीच तारेवरची कसरत सुरू असते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी एक्सरसाइज किंवा योगा त्यांना साथ डाएट फॉलो करणंही शक्य होत नाही. ज्याचा परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर होताना दिसतो. चाळीशीमध्येच त्यांना याचा त्रास जाणवतो. अशावेळी लोकं स्मार्टवॉचच्या मदतीने थोडं अलर्ट राहण्याचा प्रयत्न करतात. ज्यामध्ये आपण दिवसभर किती चाललो आणि किती कॅलरीज बर्न केल्या याचा देखील तपशील असतो.
10 हजार पाऊले चालून काय होतं?
हल्ली बाजारात किती चालणे झाले हे ट्रॅक करण्यासाठी महागातील स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहेत. तसेच अनेक प्रकारचे मोबाइल ऍप्स देखील आहेत. ज्यामध्ये तुम्ही दिवसभरात किती चाललात आणि त्यामुळे किती कॅलरीज बर्न झाले याची देखील माहिती मिळते. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावर दररोज चालण्याचे चॅलेंज देखील दिले जाते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सामान्य कार्डिओ आणि रेस्पिरेटरी फिटनेसकरिता दररोज 10 हजार पाऊले चलणे फायदेशीर ठरते.
वर्कआऊट आणि 10k Steps एकसमानच का?
तरुणांमध्ये जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत, ज्याचे एक कारण म्हणजे एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून काम करणे आणि व्यायामासाठी वेळ न काढणे. अशा परिस्थितीत वयाची 40 वर्षे पूर्ण होण्याआधीच लोक लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी अशा समस्यांशी झुंजायला लागतात. दररोज 10 हजार पावले चालल्याने शरीर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होते.
चालण्याचे आरोग्यदायी फायदे
वयानुसार किती चालणे आवश्यक?
5 ते 7 वयाची मुले
या वयातील मुलं अतिशय ऍक्टिव असतात. या वयातील मुलांनी 15 हजार ते 17 हजार पाऊले चालणे गरजेचे आहे.
18 ते 40 वयोगट
18 ते 40 वयोगटातील लोकांनी 14 हजार पाऊले चालणे गरजेचे आहे. पण यानंतर म्हणजे चाळीशीमध्ये जवळपास 11 हजार पाऊले चालणे गरजेचे असते.
50 ते 60 वयोगट
50 ते 60 वयोगटातील लोकांनी 8 हजार किंवा अगदी 10 हजार पाऊले चालणे गरजेचे आहे. पण कोणत्याही वयात चालणे हे अतिशय महत्त्वाचे असते. चालण्यामुळे तुम्हाला आरोग्यदायी फायदे होतात.