Dry Fruits With Milk: गरम दुधात हे ड्राय फ्रूट्स मिसळा; तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या
Dry Fruits And Milk Combination: दूध आणि ड्राय फ्रूट्स हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की ते एकत्र मिसळल्याने शरीराला किती फायदे होतात?
Cashews, Raisins and Almonds With Milk: दूध हे किती पौष्टिक आहे हे तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको. म्हणून घरातील वडीलधारे सुद्धा नेहमी दुध प्यावे म्हणून आपल्या मागे लागतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुधाचे कित्येक फायदे सांगण्यात आले आहे. निरोगी व्यक्तीने दिवसातून किमान 2 ग्लास दूध प्यावे असा सल्ला डॉक्टराकडून देण्यात येतो. जर आपण काही ड्राय फ्रूट्स गरम दुधात मिसळले तर त्याचे पौष्टिक मूल्य लक्षणीय वाढेल आणि आपल्या शरीराला अनेक प्रकारचे आरोग्य फायदे मिळतील.
आहारतज्ञांचा सल्ला काय आहे?
कोरडे फळे थेट किंवा भिजवून दोन्ही प्रकारे खाऊ शकतात. तुम्ही काजू, किशमिश आणि बदाम बारीक करून दुधात मिक्स करू शकता. यामुळे दुधाची चव तर सुधारेलच, पण हा एक आरोग्यदायी पर्यायही मिळेल.
दुधात काजू, किशमिश आणि बदाम मिसळून खाल्ल्याचे फायदे
- हे तीन ड्रायफ्रूट्स गरम दुधात मिसळून प्यायल्यास तुमची त्वचा तर निरोगी राहतेच पण केसही चमकदार होतील. म्हणजेच सौंदर्य वाढवण्याचा हा एक महत्त्वाचा उपाय आहे.
- जर तुम्ही काजू, मनुके आणि बदाम दुधात टाकून ते दूध उकळून प्यायले तर तुमचा चेहरा डागहीन होऊ शकतो. कारण मुरुम आणि डाग दूर करण्यात खूप मदत करते.
वाचा : कशी चालणार गाडी... CNG ची दुसरी मोठी दरवाढ, जाणून घ्या नवे दर
- काजू, मनुका आणि बदाम दुधात मिसळून प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्ती (Immunity) वाढेल. ज्यामुळे तुम्ही संसर्ग आणि अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
- दुधामध्ये असलेल्या कॅल्शियमच्या (Calcium) मदतीने हाडे मजबूत होतात. जर आपण त्यात 3 ड्रायफ्रुट्स घातल्यास आपली हाडे मजबूत होतात कारण त्यात कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी (Vitamin D) आणि मॅग्नेशियम (magnesium) असते. यामुळे सांधेदुखीतही आराम मिळू शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी, कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS NEWS याची पुष्टी करत नाही.)