मुंबई : काजू तसेच दुसरा सुका मेवा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यात काजू हे आपल्यापैकी बहुतेक लोकांचा आवडीचा मेवा आहे. काजूमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, जस्त, लोह, मँगनीज आणि सेलेनियम सारखी खनिजे आढळतात आणि व्हिटॅमिन ई देखील त्यात भरपूर असते. हिवाळ्यात दररोज काजू खाणे आरोग्यासाठी चांगले असते, परंतु काही आरोग्य समस्यांमध्ये काजूचे सेवन टाळावे. कारण त्यामुळे  तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो (Cashew Side Effects ).


पोटाच्या समस्यांमध्ये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जास्त प्रमाणात काजू खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असतील तर काजूचे सेवन करू नका.


वजन वाढू शकते


जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर काजू खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते आणि त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. काजूमध्ये कॅलरीज जास्त असतात. यामुळे वजन वाढू शकते.


ऍलर्जी असू शकते


अनेकांना काजूची ऍलर्जी असते. काजू खाल्ल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो, पुरळ उठणे, खाज येणे, उलट्या होणे किंवा जुलाब होत असल्यास त्यांचे सेवन ताबडतोब बंद करा.


डोकेदुखी


काजूमुळे डोकेदुखी होऊ शकते. काजूमध्ये असलेले अमिनो अॅसिड टायरामाइन आणि फेनिलेथिलामाइनमुळे डोकेदुखी होऊ शकते. डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होत असल्यास काजूचे सेवन करू नका.