मुंबई : आजकाल प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला उच्चदाबाचा त्रास होताना दिसत आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली, अधिक मीठाचं सेवन करणं किंवा तणावामुळे अनेक लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. उच्च रक्तदाबमुळे (हाय ब्लडप्रेशर) हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे स्वस्थ राहण्यासाठी आपला रक्तदाब नियंत्रणात असणं गरजेचं आहे. उच्च रक्तदाबाची काही तशी खास लक्षणं नसल्याने तो हळू-हळू शरीरात प्रभावित होत जातो. ही समस्या दूर करण्यासाठी दैनंदिन दिनचर्या सुरळित ठेवणं, त्यात काही आवश्यक चांगले बदल करणं महत्त्वाचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करणं आवश्यक आहे. त्याशिवाय लो फॅट डेअरी उत्पादने, सुकामेवा, कडधान्यं यासारख्या पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. 


जेवणात मीठाचं प्रमाण कमी केल्यानेही उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते. जे लोक दिवसांतून १५०० एमजीहून कमी मीठाचं सेवन करतात त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. खाताना कधीही अन्नपदार्थांवरुन मीठ टाकू नये. 


वजन वाढल्यानेही उच्च रक्तदाबाची समस्या होते. त्यामुळे कॉलेस्ट्रोल आणि मधुमेह वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या उंचीप्रमाणे आपलं वजन नियंत्रणात असणं गरजेचं आहे. 


नियमित व्यायाम करणं सर्व आजारांवर सर्वोत्तम उपाय आहे. व्यायामामुळे तणाव कमी करण्यासही मदत होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. दररोज ३० मिनिटं व्यायाम करणं उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे.