Chia Seeds Benefits : Healthy Lifestyle च्या नावावर गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच अशा गोष्टी वापरात आल्या आहेत ज्याची  यापूर्वी माहितीही नव्हती आणि माहिती असेल तर त्या वापरात आणल्या नसतील. चिया सीड्स हा त्यातलाच एक प्रकार. गेल्या काही वर्षांमध्ये चीया सीड्सना प्रचंड लोकप्रियता मिळाली, मोठमोठ्या आहारतज्ज्ञांनी (nutritionist) हा आरोग्यवर्धक घटक असल्याचंही स्पष्ट केलं. तुम्ही या बियांना सब्जा समजत असाल, तर तसं नाहीये. (chia seeds benefits and side effects)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिया सीड्स या साल्व्हिया हिस्पॅनिका (salvia hispanica) वनस्पतीची बी. ही मुळची अमेरिका (America) आणि मेक्सिको येथील वनस्पती. अनेकांच्या मते आहारात (Breakfast) चिया सीड्सचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक ती पोषक तत्त्वं मिळण्यासोबतच कोलेस्ट्रॉलही ताब्यात राहतं. पण, तुम्हाला माहितीये का यामध्ये किती कमी Proteins असतात? 


प्रोटीनचा (Protein Source) उत्तम स्त्रोत म्हणून तुम्ही जे चिया सीड्य खाता, त्यामध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं हे माहिती करुन घेण्याचा तरी तुम्ही प्रयत्न केलाय का? 


अधिक वाचा : केस गळतीवर 'या' फळाच्या बिया ठरतील फायदेशीर जाणून घ्या...


- एक टेबलस्पून (मोठा चमचा) चिया सीड्समध्ये 2.3 ग्रॅम प्रोटीन आणि 5 ग्रॅम फायबर असतं. पनीर (Paneer), सोया (Soya), चिकन (Chicken), अंडी (Eggs), ग्रीक योगर्ट (Greek Yogurt) यांच्या तुलनेत हे प्रमाण अगदी कमी आहे. 


- सुरुवातीला तुम्ही 1 टीस्पून चिया सीड्स खाण्यापासूनच या सवयीला प्रारंभ करा. कारण, यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे (Fiber) तुम्हाला पोटाचे विकार, गॅसेसचा त्रास (Gases), पोट फुगणं (Bloating) आणि पोट साफ न होणं (Constipation) यांसारख्या अडचणींचा सामना करावा लागू करतो. त्यामुळे सुरुवात कमी प्रमाणापासून केलेली उत्तम. 


- चिया सीड्ससाठी तुम्ही पुरेशा प्रमाणात पाण्याचा वापर करत आहात ना, याची काळजी घ्या. पाणी भरपूर प्या. कारण चिया सीड्स बरंच पाणी शोषतात. चिया सीड्स योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो. पण, त्याचा अतिरेक नकोच. 



तुम्हाला माहितीये का? चिया हा प्रोटीनचा स्त्रोत आहे. शरीर ज्या अमिनो अॅसिडची निर्मिती करत नाही, त्याची निर्मिती या चिया सीड्सपासून होते. शरीरातील टिश्यूचं आरोग्य संतुलित राखण्यासाठी या बिया फायद्याच्या ठरतात. शरीरात पोषक तत्त्वं शोषून घेण्याची क्षमताही या बियांमध्ये असते. पण, त्या प्रमाणातच खाल्ल्या पाहिजेत ही बाब विसरुन चालणार नाही.