मुंबई : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात धडकी भरते. लहान मुलांमध्ये कॅन्सरचा धोका तुलनेत कमी असतो. मात्र लहान वयात कॅन्सरचा सामना करणार्‍यांमध्ये आरोग्याच्या बाबतीत पुढील टप्प्यावर काळजी घेणं फारच गरजेचे असते. कारण कॅन्सरच्या उपचारादरम्यान केल्या जाणार्‍या रेडिएशनमुळे हार्मोन्सच्या कार्यावरही परिणाम होतो. 


काय होतो परिणाम ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांमध्ये कॅन्सरचा सामना करताना रेडिएशन  उपचार पद्धतीची मदत घेतली जाते. याचा मुलांच्या हार्मोन्सवर परिणाम होतो. हार्मोन्सच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने थायरॉईडच्या संबंधी आजार, टेस्टिकुलर डीस्फंक्शन, मधुमेह या आजारांचा धोका बळावतो. 


जर्नल ऑफ क्लीनिकल इंडोक्राइनोलॉजी अ‍ॅन्ड मेटॅबॉलिजममध्ये याबाबत क्लिनिकल प्रॅक्टिस गाईडलाईन्स प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 


न्यूयॉर्कमध्ये मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर्सचे चार्ल्स स्कलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहानपणी कॅन्सरशी सामना करणार्‍यांमध्ये भविष्यात इंडोक्राईन डिसऑर्डर जडण्याचा धोका अधिक असतो. यामध्ये आठ प्रमुख ग्लॅंड्सचा समावेश आहे. या ग्लॅंड्सद्वारा हार्मोन्सचा स्त्राव होतो. हार्मोन्सचा शरीराच्या विविध कार्यांवर परिणाम होतो. यामध्ये रक्तातील साखरेच्या प्रमाणात होणार्‍या चढ -उताराचा समावेश आहे.  


भविष्यात धोका किती ?  


लहान मुलांमध्ये कॅन्सर होण्याचा धोका कमी असला तरीही त्याच्या औषधोपचारांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. औषधोपचारांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे कॅन्सरवर मात करून पुढील पाच वर्ष जीवंत राहण्याची शक्यता 80% नी वाढले आहे. लहानपणी कॅन्सर मात केल्यानंतही पुढे भविष्यात दिवसा  झोप येणं, झोपेचं चक्र बिघडणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो.