कोरोनानंतर चीन दर आठवड्याला करतंय 2 करोड डासांची निर्मिती!
चीनमध्ये एक कारखाना आहे जो दर आठवड्याला 20 कोटी `चांगले डासांचं` प्रोडक्शन करतो.
मुंबई : डासांमुळे अनेक आजार होतात जे लाखो लोकांसाठी जीवघेणे ठरतात. डेंग्यू रोग डासांमुळे पावसाळ्यात अनेक लोकांचा बळी घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का की चीनमध्ये एक कारखाना आहे जो दर आठवड्याला 20 कोटी 'चांगले डासांचं' प्रोडक्शन करतो. यानंतर हे डास जंगलात आणि इतर ठिकाणी सोडले जातात. या डासांचं काम इतर डासांशी लढा देऊन रोग टाळणं हे आहे.
तुम्हाला चांगले डास कोणते आहेत? हे जाणून घ्यायचे आहे का? काही डासांना चांगले डास म्हणतात कारण ते आजार पसरवणाऱ्या डासांची पैदास थांबवतात.
हे काम चीनने एका अभ्यासानंतर सुरु केलं.
हे डास एका कारखान्यात तयार केले जातात. चीनच्या दक्षिण भागातील गुआंगझोऊ एक कारखाना आहे, ज्यामुळे हे चांगले डास बनतात. या कारखान्यात दर आठवड्याला सुमारे 2 करोड डासांची निर्मिती होते. हे डास प्रत्यक्षात वोल्बाचिया बॅक्टीरियाने संक्रमित आहेत, हा देखील एक फायदा आहे.
सुन येत सेट युनिव्हर्सिटी आणि चीनमधील मिशिगन विद्यापीठाने केलेल्या संशोधनात असं आढळून आलं की, जर वोल्बाचिया बॅक्टेरियामुळे संक्रमित डासांची निर्मिती झाली तर ते मोठ्या प्रमाणात रोग पसरवण्यासाठी मादी डासांना निष्क्रिय करू शकणार आहेत. मग या आधारावर चीनमध्ये डासांचं उत्पादन सुरू झालं. या चांगल्या डासांना Wolbachia mesquito असंही म्हणतात
प्रथम या डासांची पैदास गुआंगझोऊच्या कारखान्यात केली जाते. मग ते जंगलात आणि अशा ठिकाणी सोडले जाते ज्याठिकाणी डास अधिक प्रमाणात असतात. फॅक्टरीमध्ये तयार होणारे डास मादी डासांमध्ये मिसळून त्यांची प्रजनन क्षमता नष्ट करतात. मग त्या भागात डास कमी होऊ लागतात आणि यामुळे रोगांना प्रतिबंध होतो.
डासांची निर्मिती करणारा चीनचा हा कारखाना या कामासाठी जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. कारखान्यात जन्माला येणारे हे डास खूप आवाज करतात पण ठराविक वेळानंतर ते नष्ट होतात. विशेष गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारे रोग पसरण्याचा धोका नाही. या कारखान्यात जन्मलेले सर्व डास हे नर आहेत. या डासांची जनुके लॅबमध्ये बदलली जातात.
चीनचा हा प्रकल्प इतका यशस्वी झाला आहे की चीन ब्राझीलमध्ये आणखी एक समान कारखाना उघडणार आहे. चीनच्या या अनोख्या पद्धतीने पहिल्याच चाचणीत प्रचंड यश मिळवले होतं. ज्या भागात हे डास सोडले गेले, त्या ठिकाणी डास काही वेळातच 96% कमी झाले.