दुधासोबत करा `या` एका पदार्थाचे सेवन, Diabetes साठी ठरेल अत्यंत फायदेशीर
पण त्याचा फायदा तुम्हाला असाही करता येऊ शकतो.
Benefits of Chironji Milk: दुध हे आपल्या आहारासाठी पोषक असते कारण असे म्हटले जाते की दुधात सर्व प्रकारचे पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते.
चिरोंजी (चारोळी) चे सेवन दुधासोबत केले तर आपल्याला त्याचा अजून जास्त फायदा होतो. चारोळीचा वापर हा आपण गोड पदार्थांसाठी जास्त होतो. पण त्याचा फायदा तुम्हाला असाही करता येऊ शकतो.
काय आहेत फायदे ?
1. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील
चारोळीच्या बिया दिसायला लहान असल्या तरी आपल्या शरीरासाठी ते खूप फायदेशीर असतात. त्या दूध मिसळल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात त्यामुळे शरीर स्वच्छ होते.
2. अतिसारात उपयुक्त
जर तुम्हाला जुलाब होत असेल तर चारोळी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. चारोळी तुम्ही खिचडीमध्ये मिसळून पिऊ शकता. दूध आणि चारोळी पावडर एकत्र प्यायल्यास या समस्येचा तुम्ही सामना करू शकाल.
3. प्रतिकारशक्ती वाढेल
दूध आणि चारोळी यांचे मिश्रण तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
4. मधुमेहामध्ये फायदेशीर
मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त असलेले लोक अनेकदा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याच्या चिंतेत असतात. चारोळीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 Taas याची खात्री करत नाही.)