Cholesterol​ Signs on Skin: आपल्या शरीरात जर का कोलस्ट्रोलचे प्रमाण वाढले तर आपल्यासाठी ते फार काळजीचे होऊ बसते. कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं आणि त्यातून त्याची लक्षणे समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातून आपल्याला अशावेळी आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यातून जर का आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल हे वाढले असेल तर आपल्याला योग्य ते औषधोपचार करणं हे अत्यंत आवश्यक असते. परंतु जर का तुमच्या शरीरात जर का कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या त्वेचेवरूनही कळू शकते की तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे की नाही ते. त्यातून जर का तुम्ही याकडे दुर्लेक्ष केले किंवा तुमचे चुकून दुर्लेक्ष झाले असेल तर तुम्हाला तुमच्या या वाढत्या कॉलेस्ट्रॉककडे गांभिर्यानं पाहणं गरजेचे आहे. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की नक्की आपल्या चेहऱ्यावर अशावेळी कोणती लक्षणे दिसायला सुरूवात होते? आपल्याला याकडे योग्यवेळी लक्ष देणे फार आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे मुख्य कारणं असते ते म्हणजे तुमचे चुकीचं खाणंपिणं त्यामुळे अशावेळी आपल्याला योग्य त्या गोष्टींची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. सतत तेलकट किंवा तुपकट खाणं हे आपल्याला फार महागात पडू शकतं. त्यामुळे अशावेळी आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तेव्हा लसूण खाणं हे आपल्यासाठी फायदेशीर ठरते. सोबतच घरच्या घरी अनेक गोष्टींचा तुम्ही आहारात समावेश करू घेऊ शकता. 


कोणती आहेत लक्षणे? 


  • त्वचेची जळजळ आणि त्वेचेवर सूज येणे - तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्हाला त्वचेवर जळजळ त्वचेवर सूट येण्याचीही लक्षणे दिसू शकतात. 

  • तुमच्या डोळ्यांमध्येही फरक - जर का तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर तुमच्या चेहऱ्यावरही विविध प्रकारचे रंग दिसू लागतात. जसे की नारंगी अथवा पिवळा थरही तयार होतो. 

  • स्पॉट्स येयला लागतात - जर का तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉल असेल तर तुमच्या चेहऱ्यावर वाईट डाग तर येतात किंवा स्पॉट्स येयाला सुरूवातही होते. 

  • फोड येणे - अनेकदा कोलेस्ट्रॉल वाढल्यास चेहऱ्यावर वाईट डाग आणि फोडही येऊ शकतात. 

  • त्वचा कोरडी पडणे - कोलेस्ट्रॉल वाढल्याचे हेही लक्षण असते की तुमची त्वचा ही कोरडीही पडायला लागू शकते. 

  • त्वचेवर खाज - अनेकदा तुमच्या त्वचेवरही खाज येऊ शकते. त्यानं रॅशेसही वाढू शकतात. 

  • निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे पट्टे - तुमच्या चेहऱ्यावर निळ्या किंवा जांभळ्या रंगाचेही फोड हे येऊ लागतात किंवा तपकिरी डागही येतात. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)