Eating Chyawanprash in winter : थंडी आली की प्रत्येक घरात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी मुलांना च्यवनप्राश खाऊ घालतात. मात्र हेच च्यवनप्राश (Chyawanprash) आरोग्यदायी नसून विषारी असल्याचा अहवाल समोर आलाय. गुजरात फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीनं (Gujarat Forensic University) तयार केलेला अहवाल आयुषच्या जनरलमध्ये प्रकाशित झालाय, त्यामुळे च्यवनप्राश खाताना सतर्क राहण्याची गरज आहे. आधी हा अहवाल काय आहे ते पाहुयात


अहवाल काय सांगतो?


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    6 विविध ब्रँडच्या च्यवनप्राशची चाचणी करण्यात आली

  • च्यवनप्राशमधील फायटोकेमिकल, फेनोलीक आणि प्रोटीन कंटेंटची प्रयोगशाळेत शास्त्रीय पद्धतीने तपासणी करण्यात आली

  • त्यामध्ये कॅफेन, टॅनिन, टेर पेनोइड्स आणि शरीराला अपायकारक असलेले घटक आढळून आले आहेत. 

  • त्यामुळे केंद्रीय आयुष विभागाला च्यवनप्राशवर कठोर बंधनं लादण्याची शिफारस करण्यात आलीय


च्यवनप्राश दुधात किंवा पाण्यात टाकलं असता पूर्णपणे मिसळून जायला नको, ते तवंग स्वरुपात तरंगलं पाहिजे. यावरुन च्यवनप्राश असली की नकली हे समजून येतं. च्यवनप्राश खरेदी करण्यापूर्वी काय काळजी घ्याल? 



काय काळजी घ्याल? 


  • च्यवनप्रशाच्या बाटलीवरचा मजकूर नीट वाचा

  • च्यवनप्राशचा ब्रँड सतत बदलत राहा म्हणजे पोषक द्रव्यं मिळतील

  • च्यवनप्राश खायला सुरुवात केल्यापासून वजन वाढतं का याकडे लक्ष ठेवा

  • सेवनापूर्वी आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या


आवळ्याचं, केसरयुक्त, सोन्या-चांदीचं, शुगरफ्री.. अशा विविध फ्लेवरचं चवानप्राश आणून ग्राहकांना भुलवलं जातं. त्यामुळेच थंडीत च्यवनप्राश घेताना सावधान.