तंबाखू प्रोडक्सच्या पाकिटावर दिसणार काऊंन्सलरचा टोल फ्री नंबर
तंबाखूचं व्यसन जीवघेणं आहे. सिगारेट किंवा तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे कॅन्सरसारखा दूर्धर आजार जडण्याची शक्यता बळावते. सिगारेटच्या व्यसनामुळे अनेक लोकं कॅन्सर, हृद्यविकारासारख्या गंभीर आजाराच्या विळख्यात अडकतात.
मुंबई : तंबाखूचं व्यसन जीवघेणं आहे. सिगारेट किंवा तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे कॅन्सरसारखा दूर्धर आजार जडण्याची शक्यता बळावते. सिगारेटच्या व्यसनामुळे अनेक लोकं कॅन्सर, हृद्यविकारासारख्या गंभीर आजाराच्या विळख्यात अडकतात.
भयंकर इन्फोग्राफिक
सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करायला सरकारही अनेक प्रयत्न करत आहे. सिगारेटमुळे शरीराची होणारी अवस्था दाखवण्यासाठी सिगारेटच्या पाकिटावरही कुरूप चित्र रेखाटलेले असते. आता या जोडीला सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले जाणार आहे.
टोल फ्री नंबर
तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी 1 सप्टेंबर 2018 पासून एक टोल फ्री क्रमांक दिला जाणार आहे. 1800-11-2356 या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास तंबाखूचं व्यसन सोडण्याचे मार्ग सांगितले जाणार आहेत. व्यसन सोडण्यासाठी हा एक सकारात्मक मार्ग असल्याने त्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत.
सर्वेक्षण काय सांगते ?
जीएटीएस-2, 2016-17 च्या अहवालानुसार, 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांमध्ये तंबाखूंचं सेवन करणार्यांमध्ये 61.9 % लोकं सिगारेट, 53.8% बीडी आणि 46.2 % लोकं धुर विरहित तंबाखूचं सेवन करतात. मात्र या लोकांनी पॅकेटवर असलेल्या चित्राला, आरोग्यासंबंधी असलेल्या धोक्याला वेळीच जाणून ते व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
वेबसाईटवर माहिती
टोल फ्री नंबरची अधिसूचना आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. लवकरच भारतील प्रादेशिक भाषांमध्ये, त्यांच्या मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. 1 सप्टेंबरपासून हा संदेश लागू होणार आहे.