Coconut oil benefits : सुदृढ राहायचं असेल तर तेलाचा अवाजवी वापर टाळा, तेलकट पदार्थ खाऊ नका असा सल्ला डॉक्टर, तज्ज्ञ मंडळी आणि ओळखीतील अनेकजण देतात. पण, तुम्हाला माहितीये का एक असंही तेल आहे जे तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणामही करतं. त्वचेपासून केसांपर्यंत या तेलामध्ये असणारे घटक अशी काही जादू करतात की पाहून हैराण व्हायला होतं, हा अनेकांचाच दावा. आयुर्वेदातही उल्लेख असल्याप्रमाणं हे तेल एक Natural Moisturiser आहे. 
 
हे बहुगुणी तेल आहे खोबरेल तेल. या तेलामध्ये असणाऱ्या अँटी फंगल गुणांमुळं त्वचा निरोगी आणि स्वच्छ राहते. खोबरेल तेल हे अतिशय आरोग्यदायी मानलं जातं. यामध्ये असणाऱ्या तत्त्वांमुळं स्थूलतेपासून सुटका होण्यास मदत होते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्यूलर सायन्सच्या एका निरीक्षणपर अहवालातून समोर आलेल्या वृत्तानुसार खोबरेल तेलामध्ये  (coconut oil) अनेक अँटीऑक्सिडेंट तत्त्वं असतात. 


खोबरेल तेलाचे प्रकार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खोबरेल तेलाचेही दोन प्रकार असतात. ते म्हणजे अनरिफाइंड आणि रिफाइंड. अनरिफाइंड तेल शंभर टक्के नारळापासूनच तयार केलं जातं. त्यामध्ये कोणतीही गोष्ट मिसळली जात नाही. 


खोबरेल तेलाचे फायदे 


चरबी कमी करण्यास मदत- खोबरेल तेलामध्ये एक खास प्रकारचा सॅच्युरेटेड फॅट असतो. या घटकाला मीडियम चेन ट्राय ग्लिसराइड (MCT) असंही म्हणतात. तेलामधील हा घटक लॉरिक अॅसिड, कॅप्रेटेलिक अॅसिड आणि कॅपरिक अॅसिडपासून तयार होतो. ज्यामुळं शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. 


मधुमेह आणि हृदयरोगांमध्ये मदत - वर्जिन खोबरेल तेलामध्ये मधुमेह नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असते. शिवाय त्यात असणारे बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवून चांगल्या कोलेस्ट्रॉलला वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळं हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं. 


हेसुद्धा वाचा : रणबीर- आलियाच्या लेकिनं लावलेले हेअर क्लिप कुठं मिळतात? खरंच ते चाहत्यानं Gift दिले होते? 


पचनक्रिया सुधारते - पचनसंस्थेच्या आरोग्यासाठीसुद्धा खोबरेल तेल फायद्याचं. याच्या वापरामुळं इरिटेबल बॉवल सिंड्रोम अर्थात अपचन, अतिसार, गॅसेसचा त्रासही कमी होतो. 


केस आणि त्वचेचं आरोग्य - खोबरेल तेलाच्या वापरामुळं त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारतं. या तेलाच्या वापरामुळं सूर्यापासून येणाया 20 टक्के हानिकारक किरणांना रोखून धरतं. तर, केसांवर या तेलाचा वापर केल्यामुळं ते अधिक मजबूत आणि चमकदार होतात. 


 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, आहाराच्या सवयींमध्ये बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)