मुंबई : वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय नाही करत? अनेक प्रयत्न करता. पण या उन्हाळ्यात तुम्हाला वजन कमी करण्याची चांगली संधी आहे. हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात वजन कमी करणे अधिक सोपे असते. कारण उन्हाळ्यात भूक मंदावते. त्यामुळे कमी खाल्ले जाते आणि भरपूर पाणी प्यायले जाते. 
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी नारळपाणी फायदेशीर ठरते. रिपोर्टनुसार, रोज नारळपाणी प्यायल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी कार्ब्सचे सेवन कमी करणे गरजेचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थंडीच्या तुलनेत उन्हाळ्यात शरीराला पाण्याची अधिक गरज असते. नारळपाण्यातून ती भागवली जाते. त्याचबरोबर पचनक्षमता सुधारते आणि अॅसिडिटीसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.


अन्य फायदे


  • डायरिया, उल्टी सारख्या समस्या दूर होतात. 

  • शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. आवश्यक पोषकतत्त्वांचे प्रमाण संतुलित राहते.

  • कोलेस्ट्रोल आणि फॅट फ्री असल्याने हृद्याच्या समस्या दूर होतात. यात असलेल्या अंटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

  • उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी नारळपाणी लाभदायी ठरते. त्यात असलेल्या व्हिटॉमिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.