लघवीचा असा रंग दिसणे ठरू शकते धोकादायक, त्याकडे दुर्लक्ष करु नका
निरोगी व्यक्तीमध्ये, मूत्राचा पिवळा रंग हे लक्षण आहे की, तुमची किडनी योग्यरित्या काम करत आहे.
मुंबई : तुम्ही जर पाहिलं असेल तर व्यक्तीच्या लघवीचा रंग हा पिवळा असतो, परंतु याबाबत असा देखील समज आहे की, लघवीचा रंग स्पष्ट किंवा सफेद असणे म्हणजे तुमचं शरीर पूर्णपणे हायड्रेट आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही जर असाच विचार करत असाल, तर तुम्ही चुकीचा विचार करताय. लघवीचा रंग पूर्णपणे स्पष्ट असणे देखील तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण हे अनेक रोग सूचित करते. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
तज्ज्ञांच्या मते, लघवीचा रंग तुम्ही हायड्रेटेड आहात की नाही हे स्पष्टपणे सांगत नाही. अशा अनेक आरोग्य संस्था आहेत, ज्या मानतात की लघवीचा रंग आणि हायड्रेशनचा संबंध आहे. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे.
निरोगी व्यक्तीमध्ये, मूत्राचा पिवळा रंग हे लक्षण आहे की, तुमची किडनी योग्यरित्या काम करत आहे. त्याच वेळी, जर तुमच्या लघवीचा रंग पूर्णपणे स्पष्ट असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त द्रवपदार्थ घेत आहात, ज्याची तुमच्या शरीराला गरज नाही.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते आणि त्यानुसार प्रत्येकाच्या शरीराची पाण्याची गरजही वेगळी असते. तसेच, तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे, हे तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करत आहात यावरही अवलंबून आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ पोर्ट्समाउथमधील युरोलॉजीचे सहयोगी प्राध्यापक म्हणाले की, तुम्ही केव्हा आणि किती द्रवपदार्थ वापरता यावर तुमच्या लघवीचा रंग अवलंबून असतो. त्याने सांगितले की लघवीचा हलका पिवळा रंग योग्य आहे. जेव्हा तुमच्या लघवीचा रंग खूप गडद असतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही योग्य प्रमाणात पाणी घेत नाही.
त्यांनी सांगितले की, लघवीमध्ये संसर्ग, मूत्रपिंड आणि मूत्राशयात दगड, कर्करोग आणि मूत्राशय सिंड्रोम असल्यास, लघवीचा रंग लाल आणि तपकिरी दिसतो. त्याच वेळी, जर लघवीचा रंग केशरी दिसला तर ते यकृताच्या आजाराचे संकेत देते.
तसेच जर तुमची लघवी पाण्याप्रमाणे स्वच्छ असणे हे सूचित करते की, तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी घेत आहात. स्वच्छ लघवी हे किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या लघवीचा रंग सतत स्पष्ट दिसत असेल, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)