Common Myths Related To Cholesterol: आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नेहमी वाईट नजरेने पाहिलं जातं. कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी तेलकट आणि गोड पदार्थ टाळणं फायदेशीर ठरतं. कोलेस्ट्रॉलमुळे रक्तामध्ये प्लाक जमा होतो, ज्यामुळे नसांमध्ये रक्तप्रवाह (Blood Flow) योग्य पद्धतीने होत नाही. यामुळे हार्ट अटॅक (Heart Attack), हार्ट फेल्युअर, हायपरटेन्शन तसंच कोरोनरी आर्टरी डिसीज या समस्या बळावू शकतात. अनेकदा परिस्थिती गंभीर झाली की, रूग्णांचा मृत्यू देखील होऊ शकतो. 


Cholesterol विषयी असलेले गैरसमज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलेस्ट्रॉलसंदर्भात अनेकांच्या मनात गैरसमज देखील आहे. नेमके हे समज काय आहेत, आणि त्यामध्ये किती तथ्य आहे, हे आज आपण जाणून घेऊया


कोलेस्ट्रॉल वाईट असतं


भलेही कोलेस्ट्रॉलमुळे हृदयासंदर्भातील आजार होत असतील मात्र तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात कोलेस्ट्रॉल मिळणं गरजेचं आहे. मुळात शरीरातमध्ये 2 पद्धतीचे कोलेस्ट्ऱॉल असतात, एक LDL आणि दुसरं HDL. एचडीएल म्हणजेच हाय डेंसिटी लिपोप्रोटीन हे चांगले कोलेस्ट्रॉल असतं. हे यकृताचं कार्य उत्तम राखण्यास मदत करतात तर कमी घनतेचे लिपोप्रोटीन हृदयासाठी हानिकारक ठरू शकतं.


फीट व्यक्ती उच्च कोलेस्ट्रॉलचा आहार घेऊ शकतात


जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही फीट आहात आणि तुम्ही कोलेस्ट्रॉलचं सेवन करू शकता, तर हा समज चुकीचा आहे. तुम्ही कधीही गरजेपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉलचं सेवन करू शकत नाही. असं केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होऊन रक्तप्रवाहास अडथळा येऊ शकतो. परिणामी अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हृदयाचे गंभीर आजार होण्याचा धोकाही अधिक असतो.


खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची ही मुख्य कारणे आहेत


खाण्याच्या सवयी


सर्वप्रथम तुम्हाला आहारावर नियंत्रण मिळवावं लागेल. कारण तुम्ही ज्या प्रकारचा आहार घेत आहात त्याचा शरीरावर कोणता परिणाम होते, याची माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्ही भरपूर चरबीयुक्त पदार्थ खाल्ले तर शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत या गोष्टींपासून दूर राहिल्यास बरे होईल. तुमच्या आहारात अधिकाधिक हिरव्या भाज्यांचा समावेश करा. त्याचा तुम्हाला फायदा होईल.


लठ्ठपणा


तुम्हाला माहिती आहे का की तुमचे वजन वाढल्यावर शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचीही शक्यता असते. यासाठी वजन नियंत्रणात असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही व्यायाम, योगा करणं आवश्यक आहे.