मुंबई : कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सेवा तसंच अनेक फार्मा कंपन्यांना चालना मिळाली आहे. या काळात बऱ्याच फार्मा कंपन्यांनी कोट्यवधींचा व्यवसाय केला. यामध्ये डोलो 650 गोळी बनवणाऱ्या कंपनीचाही समावेश आहे. कोरोनाच्या या महामारीमध्ये बहुतांश डॉक्टरांनी त्यांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये या औषधाचा समावेश केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही आठवड्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणं गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसतायत. त्यानंतर सोशल मीडियावर डोलो 650 या गोळीची पुन्हा चर्चा होताना दिसतेय. डोलो गोळीवर मीम्स आणि पोस्टही शेअर केल्या जातायत. 


डोलो 650 या महामारीच्या काळात सर्वात Prescribe होणारं औषध बनलं. यादरम्यान डोलो 650 च्या 350 कोटी गोळ्यांची विक्री झाली. सुमारे 567 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री झाली असून कोरोनाच्या काळात या औषधाला जोरदार मागणी असल्याचं दिसून आलं.


दुसऱ्या लाटेमध्ये डोलो 650 या गोळ्यांची विक्री प्रचंड झाल्याची नोंद आहे. एप्रिल 2021 मध्ये, डोलो 650 टॅब्लेटची 49 कोटी रुपयांची विक्री झाली. हेल्थकेअर रिसर्च फर्म IQVIA नुसार, या औषधाची आतापर्यंतची ही सर्वाधिक विक्री आहे. यामुळेच लोकं याला भारताचा राष्ट्रीय टॅबलेट म्हणू लागलेत.


1973 मध्ये जी.सी. Micro Labs Ltd (Micro Labs Ltd.) G.C. Surana यांनी स्थापन केलेली कंपनी, 650 mg Paracetamol सह डोलो 650 गोळी तयार करते. इतर कंपन्या 500 मिलीग्राम पॅरासिटामॉलचा समावेश त्यांच्या प्रोडक्टमध्ये करतात. फार्मा कंपन्या पॅरासिटामोल त्यांच्या कॉपीराइट अंतर्गत Crocin, Dolo किंवा Calpol या नावांनी विकतात. 


डोलो 650 गोळीची लोकप्रियता वाढली


डोलो 650 गोळी कोविड दरम्यान खूप लोकप्रिय ठरली. यावर दिलीप सुराणा म्हणाले की, डोलो-650 हा अनेक दशकांपासून भारतात एक ब्रँड आहे. Dolo-650 हा नेहमीच देशभरातील डॉक्टरांमध्ये लोकप्रिय ब्रँड राहिलाय. Dolo-650 ला इतकी लोकप्रियता मिळेल अशी अपेक्षा नव्हती कारण आम्ही या गोळीची थेट जाहिरात केली नव्हती. 


कंपनी देशांतील मार्केटवर लक्ष केंद्रित करेलच त्याचसोबत बाजारातील हिस्सा वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. अमेरिका आणि युरोपवर लक्ष केंद्रित करण्याची कंपनीची योजना असल्याचंही सुराणा यांनी सांगितलंय.