सकाळी पोटच साफ होत नाही? Rujuta Diwekar ने सांगितले बद्धकोष्ठतेच्या त्रासावर 3 घरगुती उपाय
Constipation Home Remedies : सकाळी पोट साफ न झाल्यामुळे संपूर्ण दिवस खराब होतोय? यावर न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितले 3 घरगुती उपाय.
Rujuta Diwekar Health Tips : जर तुम्हाला दररोज साफ शौचाला होत नाही किंवा तुम्ही फक्त आठवड्यातून तीन वेळाच शौचाला जाता, तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. अशा लोकांना अनेकदा प्रेशर येतं पण शौच्छाला साफ होत नाही किंवा खूप ताकद लावावी लागते अशा लोकांच आरोग्य धोक्यात आहे. कारण दररोज पोट साफ होणे हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. सहज आणि मऊसूद शौचाला झाल्यामुळे दिवस चांगला जातो.
या सगळ्याला अनेक कारणे आहेत. जसे की, प्रमाणात फायबर न खाणे, पुरेसे पाणी न पिणे, शारीरिक हालचाल कमी होणे किंवा औषधे खाणे या कारणांमुळेही अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अशावेळी अनेकजण औषधांची मदत घेतात. तर काही जण अधिक पाणी पितात. पण हे उपाय तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून कायमची सुटका मिळवून देत नाही.
अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने आपल्या इन्स्टाग्रामवर उपाय सुचवले आहेत. 3 उपायांनी तुम्ही कायमची बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवू शकता.
हे 3 घरगुती उपाय
दुपारच्या जेवणानंतर खा दोन पदार्थ
पचनशक्ती वाढवण्यासाठी जेवणानंतर समप्रमाणात गूळ आणि तूप मिसळून खावे. गुळामध्ये भरपूर लोह असते, तर तुपात आरोग्यदायी चरबी असते. जेव्हा दोन्ही मिसळले जातात तेव्हा ते शरीरात एकप्रकारची शक्ती तयार करतात. हे खाल्ल्याने पोषक तत्व सहज शरीरात शोषले जातात आणि विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढले जातात.
संध्याकाळच्या नाश्तामध्ये खा हे फळ
बद्धकोष्ठतेची समस्या तेव्हाच उद्भवते जेव्हा तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असते. टरबूज / खरबूज या फळात पाण्याचे प्रमाण जास्त असते. ते तुमच्या शरीराला केवळ हायड्रेट करत नाहीत तर आवश्यक पोषक तत्वे देखील देतात. यासोबतच शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलनही राखते. म्हणून, ताजे टरबूज खा. संध्याकाळी 3-4 च्या सुमारास नाश्ता म्हणून खा. जर टरबूजचा हंगाम नसेल तर पिकलेली केळी हा तुमची हायड्रेशन पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य पर्याय आहे.
रात्रीच्या जेवणात करा समावेश
तिळाच्या लहान बियांमध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन ई आणि आवश्यक फॅटी ऍसिड असतात, जे पचन प्रक्रिया सुधारतात. आपल्या आहारात याचा समावेश करण्यासाठी, पोळ्या करताना कणिकमध्ये एक चमचे तीळ घाला. तुम्ही ज्वारी, नाचणीची भाकरी किंवा अगदी गव्हाची पोळी बनवत असाल तरी त्यात १ चमचा तीळ घाला. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी याची खूप मदत होऊ शकते.