Cooking tips: तुम्ही खात असलेलं पनीर भेसळयुक्त? घरच्या घरी ओळखा या सोप्या टीप्स वापरून
बाजारातून आणलेलं पनीर हे बऱ्याचदा भेसळयुक्त असतं अश्या वेळी योग्य आणि असली पनीर कसं ओळखावं यासाठीच या खास टिप्स...
kitchen hacks : पनीर (paneer) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर पदार्थ आहे . (benefits of eating paneer ) देशभरात शाही पदार्थ बनवायचे असतील तर पनीरचा वापर हा होतोच. भाजीपासून ते गार्निशिंगपर्यंत सगळीकडेच पनीरचा वापर होतोच होतो. (Paneer subji) सणांच्या काळात बाजारात मिठाई असो वा पनीर यामध्ये नेहमीच भेसळ होते हे आपल्याला माहीतच आहे. बाजारातून आणलेलं पनीर हे बऱ्याचदा भेसळयुक्त असतं अश्या वेळी योग्य आणि असली पनीर कसं ओळखावं यासाठीच या खास टिप्स...
चला तर मग जाणून घेऊया कसं ओळखालं तुमच्या घरात आलेलं पनीर असली आहे कि बनावटी...(cooking tips: real or fake paneer test at home )
तुर डाळीची पावडर किंवा सोयाबीन पावडर (toor daal adn soyabean powder)
सर्वप्रथम पनीर पाण्यात उकळून घ्या थंड होऊद्या त्यानंतर तूर डाळीची पावडर किंवा सोयाबीन पावडर टाका थोडा वेळ राहूद्या जर पनीरचा रंग लाल होऊ लागला तर समजून जा कि ते पनीर युरिया किंवा डिटर्जन्टपासून बनलेलं आहे. (fake paneer made by ditergent powder and urea)
आणखी वाचा: Cooking Tips: हवा लागताच 'मऊ होतात पापड? ही Tip वापरून ते पुन्हा करा कुरकुरीत
आयोडीन टिंक्चरचा वापर करा (iodine tincture)
तुम्ही बाजारातून आणलेलं पनीर असली आहे कि नकली हे ओळखायचं असेल तर आयोडीन वापरू शकता . यासततही पनीरला पाण्यात उकळून घ्या त्यानंतर त्यावर आयोडीन टिंक्चर टाका पनीर चा रंग निळा होऊ लागला तर लगेच समजून जा कितें पनीर नकली बनावटी आहे .
हाताने कुस्करून पहा (smash with hands)
बाजारातून आणलेलं पनीर हाताने कुस्करून पहा, बनावटी पनीर स्किम्ड मिल्कपासून (skimmed milk ) बनवलेलं असत त्यामुळे ते हाताने कुस्करल्यास लगेच तुटलं जात पण असली पनीर लवकर चुरा होत नाही. अश्या प्रकारच्या खराब पनीर खाल्ल्यामुळे आपली पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो पोट दुखू लागतं.
पदार्थांमध्ये या ना त्या कारणाने भेसळ करणारे आहेतच पण आपणच स्मार्ट (smart) बनून जर ती भेसळ ओळखू शकलो तर आपल्या आरोग्यावर परिणाम होण्यापासून वाचू शकू.. (cooking tips: real or fake paneer test at home )