Corona Alert : Immunity Booster साठी आजपासूनच करा `हे` उपाय
Corona Update : चीनमध्ये (China) कोरोनाने (Corona) कहर सुरु आहे. त्यातच भारतात नव्या व्हेरियंटचे (Variant) 4 रुग्ण सापडलेत. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे. कोरोनाने आपल्या घराचं दार ठोठावू नये म्हणून आजपासूनच आहारात हे बदल करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
COVID-19 BF.7 Omicron Variant : मास्क (Mask) , सोशल डिस्टेंसिंग (Social distancing), लॉकडाऊन (Lockdown) काळातील सुन्नसान रस्ते, अंगावर काटा आणणारी भयान शांतता आणि त्यात तो Ambulance चा भयानक आवाज...हॉस्पिटलमध्ये (Hospital) रुग्णांची वाढती संख्या...आजही तो क्षण आठवल्या की तरी मन सुन्न होतं. कधी न थांबणारी मुंबईही (Mumbai news) त्या महासंकटात पूर्णपणे शांत झाली होती. दीड दोन वर्षांचा तो काळ पुन्हा परतला आहे असं काहीसं चित्र झालं आहे. कारण चीनमध्ये कोरोनाने (Corona news) पुन्हा आपलं भयानक रुप दाखवलं आहे. त्यातच कोरोना पुन्हा भारतातही परतला आहे. कारण नव्या व्हेरियंटचे (Variant) 4 रुग्ण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षीही क्रिसमस आणि न्यू इयरच्या (Christmas and New Year 2022) तोंडावर कोरोना परत आला होता. आता 2022 या वर्षाला निरोप देताना पुन्हा कोरोनाने अख्खा जगाला वेठीस धरलं आहे. भारतातही केंद्र सरकारने (Central Govenment) अलर्ट (Alert Notice) जारी केला आहे. देशात मास्कसक्ती (Mask Use)पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना अजून संपलेला नाही, असं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाच्या सूचना केल्यायत.
'या' गोष्टी नक्की करा
गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा
ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घ्या
आजार असलेल्या लोकांनीही बूस्टर डोस घ्या
शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं अलर्टवर
अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश
न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी करा
लक्षण असल्यास कोरोना टेस्ट करा
'हे' करा आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Booster) वाढवा
कोरोना हा आमंत्रण न दिलेला पाहुणा कधीही आपल्या घराचे दार ठोठावू शकतं. त्यामुळे या पाहुण्याला घरापासून दूर ठेवण्यासाठी एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. त्यासाठी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात काही बदल करा. (Corona Alert Do this remedy from today to boost your immune system coronavirus new Variant home remedies)
- व्हिटॅमिन C मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून आवळा, संत्री, लिंबू, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं हे खाण्यावर भर द्या.
- अक्रोड, काजू, बदाम यासारखे ड्रायफ्रूट्स खा.
- दही, ताक, इडली, डोसा हे प्रोबायोटिक घटक पदार्थ खा.
- रोज एक ग्लास हळदीचं दूध नक्की घ्या.
- चहा, कॉफी ऐवजी हर्बल टी घ्या.
- लसूण, हळद, काळी मिरी, जिरे यांचा आहारात समावेश करा.
- हर्बल आणि घरगुती काढा घ्या.
या सगळ्या अगदी सहज करता येणाऱ्या गोष्टी आहेत. हिवाळ्यात सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर तुम्हाला कुठल्याही आजाराची सहज लागण होऊ शकते. म्हणून कोरोनाच नाही कुठल्याही आजाराला आपल्या आणि आपल्या प्रिय लोकांना दूर ठेवण्यासाठी आजच तुमच्या आहारत बदल करा आणि या गोष्टी कायम अगदी कायम आपल्या दैनंदिन जीवनाच्या भाग करा.
फक्त कोरोना नाही तर आपण हे उपाय केल्यास सदैव निरोगी राहू शकतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपलं आरोग्य कायम चांगलं राहते.