मुंबई : राज्यभरात कोरोनाची प्रकरणं वाढताना दिसतंय. त्यातच दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढतेय. बुधवारी मुंबईमध्ये 15 हजारहून अधिक रूग्ण सापडले आहेत. यामुळे आरोग्य सेवेची चिंता वाढली असून आता मुंबईतील 300 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत 300 निवासी डॉक्टरांना कोरोना बाधा झाली आहे. मुख्य म्हणजे डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं हे प्रमाण गेल्या 2 लाटांपेक्षा अधिक असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये मुंबईतील सरकारी रूग्णालय जे.जेमधील 100 डॉक्टरांना कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 


तसंच मुंबईतील नायर रूग्णालयातील 45 डॉक्टर्स, केईएममधील 60 डॉक्टर्स, सायन रूग्णालयातील 80 इतक्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय ठाणे, मिरज, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणच्या 18 डॉक्टरांना कोरोना झाला आहे.


दरम्यान मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असल्याने इतर डॉक्टरांवर ताण येतोय. कोरोना झालेल्या निवासी डॉक्टरांसाठी मुंबईतील जीटी रूग्णालयात वेगळा वॉर्ड सुरु करण्यात आला. या वॉर्डमध्ये निवासी डॉक्टरांवर उपचार सुरु आहेत.



दरम्यान मुंबईत काल कोरोनाचे 24 तासांत 15 हजार 166 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 714 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. यामध्ये एकूण 3 जणांचा मृत्यू झाला आहे.


ओमायक्रॉनचे रुग्ण किती?


राज्यात 144 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. ओमायक्रॉनचे सर्वाधक रुग्ण हे मुंबईत सापडले आहेत. मुंबईत 100 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.