मुंबई : कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या संकटाच्या काळात दिल्लीत पुन्हा एकदा संसर्गाची प्रकरणं वाढली आहेत. रविवारी दिल्लीत कोरोनाने गेल्या 6 महिन्यांचा विक्रम मोडला. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होता दिसतेय. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 107 रुग्ण आढळले असून यादरम्यान एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. 


कोरोना संक्रमणाच्या दरात वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमणाच्या दरामध्ये वाढ होताना दिसतेय. पॉझिटीव्हीटी रेट 0.17 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यापूर्वी 25 जून 2021 रोजी एकाच दिवसात सर्वाधिक 115 कोरोना रुग्ण आढळले होते. 22 जून 2022 रोजी संसर्ग दर 0.19 टक्के होता. 


दिल्लीत 10 दिवसांनंतर कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 25,101 झाली आहे. दिल्लीत कोरोनाचे 500 हून अधिक एक्टिव्ह रुग्ण आहेत.


कोणत्या राज्यात ओमायक्रॉनचे किती रूग्ण?


 


महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे आणखी 6 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, रविवारी भारतात प्रकरणांची संख्या 151 वर पोहोचली. केंद्र आणि राज्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत महाराष्ट्रात 54, दिल्लीत 22, राजस्थानमध्ये 17, कर्नाटकात 14, तेलंगणात 20, केरळमध्ये 11, गुजरातमध्ये 9, आंध्र प्रदेशात 1, चंदीगडमध्ये 1, तामिळनाडूमध्ये 1 आणि पश्चिम बंगालमध्ये ओमायक्रॉनची 1 प्रकरणं आढळली आहे.


लसीकरणानंतरही होतेय ओमायक्रॉनची लागण


 


महाराष्ट्रात, आरोग्य विभागाने सांगितलं की, रविवारी 6 जणांना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट लागण झाल्याचं आढळून आले आणि त्यामुळे राज्यात या प्रकाराची लागण झालेल्यांची संख्या 54 वर पोहोचली आहे. यापैकी दोन रुग्ण टांझानियाला गेले होते. दोघे ब्रिटनमधून परतले आहेत. दरम्यान या सर्वांचं लसीकरण पूर्ण झाल्याची नोंद आहे.