Corona मुळे पुरुषांच्या Sex Life वर परिणाम? अभ्यासात धक्कादायक खुलासा
कोरोनामुळे पुरूषांच्या सेक्स लाईफवर परिणाम होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे येत्या काळात प्रजनन दरात घट होण्याची शकत्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Corona Update : कोरोना (Corona) महामारीने जगभरात थैमान घातलं, करोडो लोकांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये अनेक दुष्परिणाम झाल्याचंही पाहिलं मिळालं. लोकांना हृदय, मू्त्रपिंड तसंच फुफ्पुसांशी संबंधीत आजार जडल्याची प्रकरण उघडकीस आली आहेत. आता या विषाणूच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत एक नवीन माहिती समोर आला आहे. कोविडची लागण झालेल्या पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर (Male Fertility) परिणाम झाल्याचं एका अभ्यासात समोर आलं आहे. क्युरियस जर्नल ऑफ मेडिकलमध्ये (Curious Journal of Medical) हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.
या संशोधनात कोरोनाची लागण होऊन गेलेल्या पुरुषांच्या वीर्याची (Semen) चाचणी करण्यात आली. दिल्ली, पाटणा आणि मंगलागिरी एम्सच्या डॉक्टरांच्या टीमने हा अभ्यास केला आहे. यात 19 ते 43 वयोगटातील 30 पुरूषांच्या वीर्याची चाचणी घेण्यात आली. या सर्वांना कोविडची लागण झाली होती. संसर्ग झाल्यानंतर लगेचच त्याची पहिली स्पर्म टेस्ट (Sperm Test) करण्यात आली. त्यानंतर सुमारे अडीच महिन्यांनी दुसरी चाचणी झाली. या वेळेनंतरही शुक्राणूंची संख्या (Sperm Count) कमी आढळून आली. शुक्राणूंची गुणवत्ता तीन प्रकारे मोजली जाते. यामध्ये शुक्राणूंची संख्या, शुक्राणूंचा आकार आणि त्याची हालचाल पाहिली जाते.
40 टक्के पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी
पहिल्या चाचणीत 40 % पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी झाल्याचं स्पष्ट झालं तर अडीच महिन्यांनंतर घेण्यात आलेल्या दुसऱ्या चाचणीत तीन पुरूषांच्या वीर्याचा दर्जा अत्यंत कमकुवत असल्याचं दिसून आलं. 22 पुरूषांच्या शुक्राणूंची हालचाल खूपच मंद होती. चिंतेची बाब म्हणजे 10 आठवड्यानंतरही कोरोनाचा वीर्यावर प्रभाव दिसून आला.
पुरुषांच्या सेक्स लाईफवर परिणाम
तज्ज्ञांच्या मते तीन गोष्टींमुळे पुरूषांच्या सेक्स लाईफवर (Sex Life) परिणाम होऊ शकतो. कोरोनामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. लिंगापर्यंत पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यानं नपुंसकता येऊ शकते, कोरोनामुळे अनेक रूग्णांमध्ये नैराश्य येतं त्याचा परिणाम लैगिंक जीवनावर होऊ शकतो आणि तिसरं कारण म्हणजे कोरोनानंतरही शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. नपुसंकतेसाठी हे देखील एक कारण असू शकतं.
जगभरातील संशोधक कोरोनाच्या परिणामांवर संशोधन करताना पुरूषांच्या लैंगिग जीवनावरही अभ्यास करतायेत. आता भारतातही पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर कोरोनाचा परिणाम झाल्याचं स्पष्ट होतंय. ही निश्चितच चिंतेची बाब म्हणावी लागेल.