मुंबई : कोरोना व्हायरसचा नवा म्यूटेंट व्हेरिएंट XE हा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 पेक्षा 10 पटीने संक्रामक असू शकतो. कोरोनाच्या या व्हेरिएंटबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. XE हा ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 या दोन सब व्हेरिएंटचा रीकॉम्बिनेंट आहे. डब्ल्यूएचओने त्यांच्या अहवालात म्हटलं की, जोपर्यंत त्याच्या ट्रांसमिशन रेट आणि व्हेरिएंटच्या वर्तनात महत्त्वपूर्ण बदल दिसून येत नाही तोपर्यंत ते ओमायक्रॉन व्हेरिएंटशी संबंधित असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहवालानुसार, हा व्हेरिएंटचा कम्युनिटी ग्रोथ रेट BA.2 च्या तुलनेत 10 टक्के जास्त असल्याचे संकेत आहेत. मात्र हे सत्य आहे का, हे पाहण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.


WHO च्या म्हणण्याप्रमाणे, BA.2 सब-व्हेरिएंट आता जगातील सर्वात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. यूकेमध्ये 19 जानेवारी रोजी प्रथम XE स्ट्रेन आढळून आला आणि तेव्हापासून 600 हून अधिक XE प्रकरणांची नोंद झाली आहे.


XE सारख्या रीकॉम्बिनंट व्हेरिएंटच्या धोक्यांवर लक्ष ठेवून आहोत, असं जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात म्हटलं आहे. XE व्यतिरिक्त, डब्ल्यूएचओ आणखी एक रीकॉम्बिनंट व्हेरिएंट XD वर देखील लक्ष ठेवलं जातंय. हा डेल्टा आणि ओमिक्रॉनचा एक हायब्रिड आहे. त्याची बहुतेक प्रकरणं फ्रान्स, डेन्मार्क आणि बेल्जियममध्ये आढळून आल्याची माहिती आहे.