इस्रायल : WHO कडून जी भीती व्यक्त करण्यात आली होती ती खरी ठरली आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉनमुळे कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला आहे. तर आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. Israel मध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट सापडला आहे. आतापर्यंत या व्हेरिएंटची दोन प्रकरणं समोर आली आहेत. हा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 या दोघांचं मिश्रण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर प्रवाशांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन प्रवाशांच्या आरटी पीसीआर अहवालात हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय की, संपूर्ण जगाला या व्हेरिएंटबाबत कोणतीही माहिती नाही.


ही आहेत नव्या व्हेरिएंटची लक्षणं


आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाणे, इस्रायलमध्ये या व्हेरिएंटच्या दोन प्रकरणांमध्ये, सौम्य ताप, डोकेदुखी आणि मसल्ससंदर्भात विकार यांसारखी लक्षणं दिसून आली आहेत. 


इस्रायलचे पॅन्डेमिक रिस्पांस चीफ सलमान जरका यांनी, याबाबत आम्हाला चिंता नसल्याचं म्हटलं आहे.


BA-2 व्हेरिएंटबाबत WHO सतर्क


कोरोनाच्या या उप प्रकाराला BA-2 असंही नाव देण्यात आलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोनाचा हा व्हेरिएंट मूळ प्रकारापेक्षा वेगळा आहे. याला हलक्यात घेणं महागात पडू शकतं. या व्हेरिएंटला डिटेक्ट करण्यात अनेक अडचणी येत आहेत. हा BA-2 प्रकार कोविडच्या मूळ प्रकारापेक्षा अधिक धोकादायक सिद्ध होऊ शकतो, अशी भिती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.