मुंबई : शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या 2 हजारांहून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आली. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 2336 नवे रुग्ण आढळलेत. तर, साथीच्या आजाराने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील बाधितांची संख्या 80,32,199 झाली असून मृतांची संख्या 1,48,056 वर पोहोचली आहे.


2,311 साथीच्या आजारातून बरे झाले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 2311 लोक कोरोनामधून बरे झालेत. त्यानंतर महामारीतून बरं झालेल्या लोकांची एकूण संख्या 78,69,591 झाली आहे. राज्यात शनिवारी 97.97% व मृत्यू दर 1.84% नोंदवला गेला. सध्या राज्यात 14,599 सक्रिय रुग्ण आहेत.


मुंबईत 266 नवीन रुग्ण, 1 मृत्यू


मुंबईत कोरोनाचे 266 नवीन रुग्ण आणि 1 मृत्यूची नोंद झालीये. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या 1,122,674 झाली आहे. तर मृतांचा आकडा 19,638 वर पोहोचला आहे. 


शनिवारी शहरात 281 लोक या कोरोनामुक्त बरे झाले आहेत. त्यानंतर महामारीतून बरे झालेल्या लोकांची संख्या 1,101,181 झाली आहे. सध्या शहरात 1,855 सक्रिय रुग्ण आहेत.