मुंबई : कोरोना व्हायरसच्या चौथ्या लाटेची भीती असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंगळवारी काही अटींसह सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवोव्हॅक्स लसीला मंजुरी दिली. ही लस 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे. DCGI ने मर्यादित आपत्कालीन वापरासाठी ही मान्यता दिलीये.


DCGI ने मंगळवारी दिली मंजुरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात सरकारच्या कोविड तज्ज्ञ समितीने या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती. ज्यानंतर DCGI ने मंगळवारी ही घोषणा केली. यापूर्वी, 16 मार्च रोजी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि नियामक व्यवहार संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी या संदर्भात DCGI ला एक विनंती पत्र दिलं होतं.


DCGI ने यापूर्वी 28 डिसेंबर रोजी प्रौढांमधील आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापरासाठी कोवोव्हॅक्सला मान्यता दिली होती. 9 मार्च रोजी 12 ते 17 वयोगटातील मुलांसाठी काही अटींसह मान्यता देण्यात आली. 


भारताने 16 मार्च रोजी 12-14 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू केलं. अशाप्रकारे आता देशात 7 वर्ष ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी ही लस आलीये.


भारतात कोरोना प्रकरणांमध्ये चढ-उतार होताना दिसतेय. गेल्या 24 तासांत 11,793 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जे ही प्रकरणं एका दिवसापूर्वी आलेल्या प्रकरणांपेक्षा 32 टक्के कमी होती. देशातील बहुतेक राज्यांमध्ये संसर्ग नियंत्रणात आहे, परंतु महाराष्ट्र आणि केरळमध्ये एक्टिव्ह कोरोना रुग्ण आणि पॉझिटीव्हीटी प्रमाण कमी होत नाही.