मुंबई : फक्त भारतातचं नाही तर संपूर्ण जगात ओमायक्रॉनने डोकं वर काढलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी अशा वेळी एक दिलासादायक बातमी दिली आहे. यावर्षीच कोरोनाचा खात्मा होणार... अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. डॉ. टेड्रोस यांचा दाव सर्वांसाठी दिलासादायक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी कोरोना साथ यंदाच्या वर्षात संपुष्टात येण्याची शक्यता आहे... जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी हा दिलासादायक दावा केलाय..मात्र त्यासाठी विकसित देशांनी आपल्याकडील लसींचा गरीब देशांना पुरवठा केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. 



जगात कोरोना लसींचे समप्रमाणात वाटप न झाल्यामुळे कोरोनाचा धोका वाढल्याचं ते म्हणालेत.  त्यामुळे विकसित देशांनी त्यांची लस इतर देशांना द्यावी असं म्हणत, यावर्षीच कोरोनाचा खात्मा होणार.. अशी दिलासादायक माहिती त्यांनी दिली आहे.