चिंता वाढतेय! कोरोनाचा नवा व्हेरिएंट C.1.2 अतिशय धोकादायक
कोरोना व्हायरसचं एक नवं रूप सापडलं आहे.
मुंबई : संपूर्ण जगाला कोरोनाचा धोका आहे. त्यातच कोरोनाचे नवे व्हेरिएंट समोर येत आहेत. नुकतंच दक्षिण अफ्रिकामध्ये आणि इतर काही देशांमध्ये कोरोना व्हायरसचं एक नवं रूप सापडलं आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट अधिक संक्रामक असण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर लसीपासून मिळाणाऱ्या सुरक्षेला देखील हा व्हेरिएंट मात देऊ शकतं असं म्हटलं जातंय.
शास्त्रज्ञांची चिंता वाढली
दक्षिण आफ्रिकेत असलेल्या नॅशनल इंस्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीज अँड क्वाजुलु नॅटल रिसर्च इनोवेशन अँड सिक्वेंसिंग प्लेटफॉर्मच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट C.1.2 सर्वात पहिल्यांदा मे महिन्यात सापडला. तेव्हा पासून 13 ऑगस्टपर्यंत हा व्हेरिएंट चीन, कांगो, मॉरीशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल और स्वित्झलंडमध्ये हा व्हेरिएंट सापडला आहे.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिकेत कोविड 19 च्या पहिल्या लाटेदरम्यान समोर आलेल्या व्हायरसच्या Subtypesपैकी एक C.1च्या तुलनेत C.1.2 जास्त म्युटेट झाला. ज्याला 'Nature of Interest'च्या श्रेणीत वर्गीकृत करण्यात आलं आहे.
प्रत्येक महिन्यात जीनोमची संख्या वाढतेय
शास्त्रज्ञांनी सांगितले की C.1.2 अधिक संसर्गजन्य असू शकतो. शिवाय तो कोरोना लसीद्वारे मिळणाऱ्या संरक्षणाला मात देऊ शकतात. एका अभ्यासात असं आढळून आलं की, दक्षिण आफ्रिकेतील C.1.2 चा जीनोम दर महिन्याला वाढतो आहे. मे मध्ये 0.2 टक्क्यांवरून जूनमध्ये 1.6 टक्के आणि जुलैमध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढलंय.
जलद गतीने वाढतोय हा व्हेरिएंट
सीएसआयआर, कोलकाताचे वैज्ञानिक राय म्हणाले, "त्याचा प्रसार जास्त असू शकतो आणि तो वेगाने पसरण्याची शक्यता आहे. वाढलेले प्रोटीनमध्ये अनेक म्यूटेशन असतात. ज्यामुळे हा रोग प्रतिकारशक्तीच्या नियंत्रणात राहत नाही. जर तो पसरला तर जगभरातील लसीकरणासाठी हे एक आव्हान बनेल.