भारतात Corona ची तिसरी लाट येणार? काय म्हणाले डॉ. रवी गोडसे...
येत्या महिन्यांत चीनमध्ये 80 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग (Corona Ifection) होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यासाठी भारत सरकार देखील अलर्टवर आहे. याचबाबत झी 24 तासने डॉ. रवी गोडसे यांच्या एक्स्लुझिव्ह संवाद साधला आहे.
Coronavirus in India : कोरोनाचा (Corona) धोका अजूनही टळलेला नाहीये, कारण चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाची मोठी लाट आली आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाची ही सर्वात मोठी लाट असल्याचं म्हटलं जातंय. अशातच येत्या महिन्यांत चीनमध्ये 80 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग (Corona Ifection) होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. यासाठी भारत सरकार देखील अलर्टवर आहे. याचबाबत झी 24 तासने डॉ. रवी गोडसे यांच्या एक्स्लुझिव्ह संवाद साधला आहे.
चीनमध्ये आलेला कोरोनाचा हा व्हेडिएंट किती धोकादायक ठरू शकतो यावर डॉ. रवी गोडसे म्हणतात की, भारतामध्ये तिसरी लाट येणार नाही. मी यापूर्वी देखील हे सांगितलं होतं. मुळात चीनमध्ये जे झालंय ते अपेक्षित होतंच. चीनमध्ये उद्भवलेली परिस्थिती नवीन नाही. मात्र तशी परिस्थिती भारतात उद्भवणार नाही.
डॉ. गोडसे पुढे म्हणाले, भारतीयांना इतकं घाबरण्याची काहीही गरज नाहीये. कारण भारतामध्ये नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसी घेतल्या आहेत. काहींनी दोन डोस घेतले असतील तर काहींनी बूस्टर डोस घेतले असतील, त्यामुळे लोकांना घाबरण्याची गरज नाहीये. चीनमध्ये जो व्हेरिएंट आहे, तो नवीन व्हेरिएंट नाही. भारतामध्ये हा व्हेरिएंट येऊन गेला आहे. ओमायक्रॉनची लागण होईल, मात्र तो तुम्हाला रूग्णालयात दाखल करणार नाही."
चीनमध्ये अशी परिस्थिती का उद्भवली?
चीनमध्ये झिरो कोविड केल्यामुळे कोरोनाशी दोन हात कसे करावे याबाबत त्यांना अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडे अशी परिस्थिती उद्भवली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
80 कोटी लोकांना होणार कोरोनाचा संसर्ग
येत्या महिन्यांत चीनमध्ये 80 कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग (Corona Ifection) होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. लंडनच्या ग्लोबल हेल्थ इंटेलिजंस कंपनी एयरफिनिटी (London based global health intelligence company Airfinity) यांच्या सांगण्यानुसार, चीनमध्ये झीरो कोविड पॉलिसी संपल्यानंतर 21 लाख रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. यामागील कारण हे लसीकरण आणि अंटीबॉडीजची कमी असल्याचं देखील म्हटलंय.
60 टक्के लोकांना होणार संसर्ग
अमेरिकेतील संस्था एनपीआरमध्ये पब्लिश करण्यात आलेल्या अहवालानुसार, कोरोनाच्या या लाटेत देशातील जवळपास 60 टक्के लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. येल युनिवर्सिटीतील सार्वजनिक आरोग्यावर रिसर्च करणाऱ्या तसंच चिनी आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ शी चेन यांनी हा अहवाल सादर केलाय. याचाच अर्थ येणाऱ्या 90 दिवसांमध्ये पृथ्वीवरच्या तब्बल 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.