नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेमध्ये 25 नोव्हेंबरला कोरोना ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची. जवळपास 10 दिवसांनी संसर्गाचा वेग हा थेट 25 हजारांवर पोहोचला. आता महिन्याभरानंतर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. (Coronavirus Omicron)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऱ्या जगात जिथं कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे, तिथंच दक्षिण आफ्रिकेनं या विषाणूला कसं नमवलं? हाच प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करु लागलं आहे. 


दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन विद्यापीठानं याचं उत्तर दिलं आहे. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार हाडांमध्ये असणाऱ्या 'बोन मॅरो'मधील खास पेशी, टी सेल ओमायक्रॉनवर मात करण्यात मदत करणार आहेत. 


हाडांमधील कोणत्या पेशींची महत्त्वाची भूमिका? 
संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार टी सेल या पेशी कोरोनावर मात करण्यात हातभार लावत आहेत. माणसाच्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या पांढऱ्या पेशी असतात. 


शरीरावर कोणत्याही विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास त्याच्याशी लढण्याचं काम या पेशी करतात.


रोगप्रतिकारक शक्तीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या पेशी आहेत टी आणि बी सेल्स. 


भारतानं दक्षिण आफ्रिकेकडून काय शिकावं? 
द. आफ्रिकेत कोरोना रुग्णांत झपाट्यानं वाढ झाल्यानंतर लगेचच हे आकदे 30 टक्क्यांनी खाली आले. सध्या तिथं 11 हजार रुग्णांना दर दिवशी कोरोनाची लागण होत असल्याचं दिसत आहे. 


इथं कोरोना रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांनाही सावध करत त्यांचीही चाचणी करण्यात येत आहे. 


तपास आणि चाचणी- कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्ताक आलेल्या सर्वांना शोधत, त्यांचा तपास घेत त्यांचीही चाचणी करण्यावर भर. 


लसीकरण- द. आफ्रिकेनं स्थानिक प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लसीकरणाला मोठा वेग दिला आहे. ज्यामुळं शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. 


कठोर नियम- रात्रीच्या वेळी कर्फ्यूसारख्या नियमांची अंमलबजावणी करत गर्दी टाळण्यासाठी सातत्यानं तिथे प्रयत्न सुरु आहेत. 


इथे महत्त्वाचा मुद्दा असा, की भारतातही याच मार्गांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणल्यास कोरोनाची ही लाटही थोपवून लावता येईल. 


किती आहे कोरोनाचा परिणाम? 
काही देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण तेव्हा वाढले जेव्हा तिथं डेल्टा अतिशय झपाट्यानं पसरला. दक्षिण आफ्रिकेमध्ये हा व्हॅरिएंट तेव्हा पसरला जेव्हा इथं डेल्टाचे रुग्ण कमी होते. 


ओमायक्रॉनचा परिणाम तीन गोष्टींवर अवलंबून असतो... 
- फुफ्फुसांवर याचे परिणाम होण्याचा वेग 10 पटींनी कमी
- टी सेल ओमायक्रॉनविरोधात लढण्यास सक्षम 
- एचआटव्ही, टीबी सारख्या रुग्णांना ओमायक्रॉनचा धोका 


लसीकरणामुळंही ओमायक्रॉनशी लढा देता येत आहे. शिवाय ज्यांना याआधी कोरोना होऊन गेला आहे त्यांना या व्हॅरिएंटचा धोका कमी असल्याची बाब समोर आली आहे.