Corona Update News : देशात कोरोना संसर्गाचा प्रसार चौपट वेगाने होत आहे. कोरोना दैनंदिन रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे, तर ओमायक्रॉन बाधितांचा आकडाही तीन हजाराहून अधिक झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IIT मद्रास येथील गणित विभागातील प्राध्यापक डॉ. जयंत झा यांनी या संदर्भात गंभीर इशारा दिला आहे. देशभरात कोरोना सातत्याने वाढत आहे, अशा परिस्थितीत देशात १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. एकट्या दिल्लीत या काळात ३५ ते ७० हजार प्रकरणं अपेक्षित आहेत.


डॉ. जयंत झा यांच्या मते, 25-31 डिसेंबरच्या आठवड्यात R-NAT मूल्य 2.9 होतं, जे या आठवड्यात म्हणजे 1 ते 6 जानेवारी दरम्यान वाढून चार झाले आहे. आर नॉट व्हॅल्यूचं हे मूल्यांकन गेल्या दोन आठवड्यांच्या प्रकरणांच्या आधारे करण्यात आलं आहे. 


देशात कोरोनाचा विस्फोट
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या चोवीस तासात १ लाख ७५ हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २२६ दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे.  याआधी गेल्या वर्षी ३१ मे रोजी १ लाख ५२ हजार रुग्ण आढळले होते. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 


Omicron प्रकरणे तीन हजार पार
देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. ओमायक्रॉन प्रकरणांची संख्या 3,071 पर्यंत वाढली आहे, त्यापैकी 1,203 बरे झाले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनची सर्वाधिक 876 प्रकरणे आहेत. याशिवाय दिल्लीत 513, कर्नाटकात 333, राजस्थानमध्ये 291, केरळमध्ये 284 आणि गुजरातमध्ये 204 रुग्ण ओमायक्रॉनचे आढळले आहेत. ओमायक्रॉन आतापर्यंत 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे.