मुंबई :  कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. ताप, सर्दी, खोकला झाला तरी आता नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक जण अशा महामारीच्या परिस्थितीत स्वत:ची कोरोना चाचणी करण्यासाठी इच्छुक आहेत. कोरोना चाचणी करण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या फीमुळे अनेक नागरिक कोरोना व्हायरसची चाचणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचं चित्र समोर येत आहे. प्रत्येक ठिकणी कोरोना व्हायरस चाचणीच्या दरात चढ-उतार असल्याचं दृष्टीस येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता संपूर्ण देशात या चाचणीसाठी एकच रक्कम ठरवून दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२ हजार ५०० रूरयांपेक्षा जास्त पैसे लॅब आकारू शकत नाही.
ICMR ने ८७ लॅबची यादी प्रसिद्ध केली आहे. या लॅबमध्ये आता कोरोना चाचणी फक्त २ हजार ५०० रूपयांमध्ये होणार आहे. झी बिझनेसने दिलेल्या वृत्तानुसार ICMRने देशातील १५ राज्यामध्ये या लॅबची निर्मिती केली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त लॅबची निर्मिती महाराष्ट्र राज्यात करण्यात आली आहे. 


महाराष्ट्र- २०, तेलंगना- १२, दिल्ली-११, तामिळनाडू-१०, हरियाणा-७, बंगाल-६, कर्नाटक- ५, गुजरात- ४, केरळ, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये २ लॅबची निर्मिती करण्यात आली आहे तर उत्तराखंड आणि ओडिशामध्ये एक लॅब कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी उभी करण्यात आली आहे. 


उत्तर प्रदेश सरकारचे प्रधान सचिव अमित मोहन प्रसादयांनी एक आदेश दिला आहे. कोरोना व्हायरसच्या सिंगल फेज चाचणीसाठी २ हजार ५०० रूपयांपेक्षा जास्त पैसे आकारण्यात आल्यास त्या लॅबवर कठोर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


सध्या देशात तब्बल २३ हजार ४५२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ हजार ८१४ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. देशात ७२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.