सणासुदीच्या दिवसांना Coronavirus चं गालबोट; WHO कडून चिंतेची बाब अखेर समोर
Coronavirus : जे होऊ नये यासाठी सर्व आटापिटा सुरु असताना, भीती होती तेच झालं. कोरोनाच्या नव्या लाटेची सुरुवात नेमकी कधी? सावध राहा!
Coronavirus News : सणासुदीच्या दिवसांमध्ये आता कोरोनानं (Corona) पुन्हा एकदा संपूर्ण जगाचीच चिंता वाढवली आहे. तिथे जगभरात कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटनं (Sub veriant) धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली असताना इथे, (Corona updates in india) भारतातही आरोग्य मंत्रालयाकडून ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटविषयी सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तिथे जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त करत नागरिकांना सतर्क केलं आहे. (WHO) च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगिल्यानुसार सार्स-कोव-2 व्हायरसच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटच्या XBB या सब व्हेरिएंटमुळे काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची लाट येऊ शकते.
अधिक वाचा : भिजवलेल्या शेंगदाण्याचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम?
दरम्यान, लस (CoronaVaccine) निर्मिती करणाऱ्या डीसीवीएमएनच्या वार्षिक बैठकीत देण्यात आलेल्या महितीनुसार अद्यापही देशात अशा व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आलेली नाही. पण, स्वामीनाथन यांच्या इशाऱ्यानुसार ओमायक्रॉनचे 300 हून अधिक सब व्हेरिएंट असून ही चिंतेची बाब आहे.
Antibodies चासुद्धा या व्हेरिएंटवर काहीच परिणाम होत नाही. यामुळं येत्या काळात जगभरातील अनेक देशांमध्ये XBB चे रुग्ण आढळण्यास सुरुवात होऊ शकते. कोरोनाचा हा धोका पाहता पुन्हा एकदा नागरिकांनी काळजी घेत मास्क वापरण्यास सुरुवात करणं गरजेचं असणार आहे.
अधिक वाचा : तुमच्या पोटातच नाही तर नसांमध्येही भरतोय गॅस; शरीर करतंय अलर्ट
तिथे डीसीवीएमएननं दिलेल्या माहितीनुसार नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले नसले तरीही महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यामध्ये या सब व्हेरिएंटचे 18 रुग्ण आढळले. यामध्ये 13 रुग्ण पुणे (Pune, Nagpur, Thane), दोन नागपुर आणि ठाणे, तर एक रुग्ण अकोल्याचा असल्याची माहिती मिळाली.
सध्या दिवाळीचे (Diwali 2022) दिवस पाहता, होणारी गर्दी आणि काही अंशी नागरिकांचा हलगर्जीपणा कोरोना फोफावण्यास वाव देऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा सावधगिरी बाळगूनच दिवाळी साजरा करा...