Correct process of cooking rise: भात शिजवताना (cooking the rice) योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते. त्यामुळे तांदूळ शिजवण्याची एक खास पद्धत शास्त्रज्ञांनी सांगितली आहे. त्या पद्धतीचं अनुकरण केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.  कारण चुकीच्या पद्धतीने तुम्ही भात शिजवला तर तुम्हाला थेट हृदयविकाराचा झटका ( Heart Attack) देखील येऊ शकतो किंवा कँसर ( Cancer) देखील होऊ शकतो.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निरोगी आयुष्यासाठी घरात तयार केलेल्या पदार्थांचं सेवन करायला हवं, असा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमी देतात. अन्नपदार्थांतून मिळणारी पोषक द्रव्यं (Nutrients) नाहीशी होऊ नयेत म्हणून काळजी घेणं गरजेचं असतं.  प्रत्येक भारतीय कुटुंबात वरण, पोळी, भाजी, भात या अन्नपदार्थांचा हमखास समावेश असतो. भाताशिवाय आपलं जेवण पूर्ण होऊच शकत नाही. परंतु मधुमेह (Diabetes) असणाऱ्या किंवा स्थूल व्यक्तींना भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. चुकीच्या पद्धतीने भात शिजवल्यास त्यातली पोषक द्रव्यं नष्ट होण्याची भीती असते. भात शिजवण्याची योग्य पद्धत शेफिल्ड विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी सांगितली आहे. 


वाचा : तुम्हीही ATM Card वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी; मिळणार 5 लाख रुपये!   


भात शिजवण्यापूर्वी सुरुवातीला तांदूळ 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. त्यामुळे त्यातला आर्सेनिक (Arsenic) हा घटक निघून जातो. त्यानंतर तांदळांमध्ये पाणी घालून मंद आचेवर ते शिजवायला ठेवावेत. तांदळांनी सगळं पाणी पूर्णत: शोषून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा. संशोधन असं सांगतं, की या पद्धतीने तांदूळ शिजवले तर ब्राउन राइसमधून 50 टक्क्यांपर्यंत आर्सेनिक निघून जाईल. सर्वसाधारण तांदळांतून तर 74 टक्क्यांपर्यंत आर्सेनिक निघून जातं.


आर्सेनिक म्हणजे नेमकं काय?


आर्सेनिक माती (Arsenic soil) आणि पाण्यामध्ये आढळतं. इतर खाद्यपदार्थांच्या तुलनेत तांदळामध्ये आर्सेनिकचं प्रमाण जास्त असतं. कारण भातशेतीसाठी पाण्याचा सर्वाधिक वापर होत होतो. आर्सेनिक हे एक प्रकारचं रसायन आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कीटकनाशकांमध्ये याचा वापर केला जातो. उलटी, पोटदुखी, जुलाब किंवा कॅन्सरसाठी आर्सेनिक कारणीभूत ठरू शकतं.


कँसर आणि हार्ट ऍटॅकसाठी कसा हानिकारक ठरतो भात 


सध्या पिकं मोठ्या प्रमाणात यावीत यासाठी झाडांवर मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते. रासायनिक खतांचा वापर केला जातो. या फवारणीत आणि रासायनिक खतांमधील विषारी भाग हा भाताला दूषित करतो. भातात हे टॉक्सिन्स वाढल्याने तांदळातील आर्सेनिक नावाच्या विषाचं प्रमाण वाढतं. यामुळे तुम्हाला हार्ट ऍटॅक (Heart attack) किंवा कँसरचा (Cancer) धोका वाढू शकतो.