Covid-19: कोरोना आता वैश्विक महामारी नाही; WHO ची मोठी घोषणा
WHO on Covid-19: जगाभरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आनंदाची बातमी समोर आलीये. कोरोना आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आपात्कालीन परिस्थिती राहिलेली नसल्याचं WHO ने म्हटलं आहे.
WHO on Covid-19: जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी म्हणजे, कोरोनाला ( Covid - 19 ) आता जागतिक आरोग्य आपात्कालीन परिस्थितीतून ( global health emergency ) वगळण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health Organisation ) याबाबत मोठी घोषणा केली आहे. WHO यासंदर्भात बैठक घेतली होती आणि या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला.
WHO च्या म्हणण्यानुसार, कोरोना ( Covid - 19 ) ही आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आपात्कालीन परिस्थिती राहिलेली नाही. याला जागतिक आरोग्य आपात्कालीन ( global health emergency ) म्हणून वगळण्यात आलं आहे. याचाच अर्थ कोरोना ( Covid - 19 ) हा आजार कायम राहील, पण त्यामुळे मृत्यूचा धोका नाही.
डॉ. टेड्रोस अद्यनोम घेब्रेयेसस हे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार, गुरुवारी आपत्कालीन समितीची 15 वी बैठक घेण्यात आली. यावेळी मी कोरोनाला जगात कोविड-19 ( Covid - 19 ) ला जागतिक आरोग्य आपात्कालीन परिस्थितीच्या बाहेर घोषित केलं.
डॉ. टेड्रोस यांनी सांगितले पुढे असंही सांगितलं की, गेल्या आठवड्यामध्ये दर 3 मिनिटाला एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. जगभरात हजारो लोक अजूनही आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंजतायत.
2020 मध्ये वैश्विक महामारी म्हणून जाहीर केलं होतं
जवळपास गेले 4 वर्ष संपूर्ण जग कोरोनाचा सामना करतोय. 30 जानेवारी 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला वैश्विक महामारी म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर आज कोरोनाला जागतिक आरोग्य आपात्कालीन परिस्थितीतून ( global health emergency ) वगळलं आहे. मात्र अजूनही कोरोनाचा जागतिक आरोग्यसाठी धोका असल्याचं डब्लूयएचओचं ( World Health Organisation ) म्हणणं आहे.
डब्ल्यूएचओच्या म्हणण्याप्रमाणे, ज्यावेळी कोरोनाला वैश्विक महामारी ( global health emergency ) घोषित करण्यात आलं होतं, त्यावेळी चीनमध्ये ( china ) 100 पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद जाली होती. शिवाय त्यावेळी एकाचाही मृत्यू झालेला नव्हता. परंतु 3 वर्षानंतर मृतांचा आकडा 7 दशलक्ष झाला असून सुमारे 2 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. याशिवाय त्यावेळी कोरोनाला ( Covid-19 ) हे नावंही देण्यात आलं नव्हतं.