थंडीच्या मोसमात अनेकांना ओठ फाटण्याची (Cracked Lips)  समस्या सतावते. काहिंचे ओठ मोठ्या प्रमाणावर फाटतात, यामुळे त्यामधून रक्तस्त्राव देखील होतो. तर काहिंचे ओठ काळे पडतात. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही काही घरगुती उपाय सांगतो. हे घरगुती उपाय (Home remedies) करून तुम्ही तुमचे ओठ पहिल्यासारखे करू शकता. दरम्यान हे उपाय कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.


'हे' घरगूती उपाय करा


मध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाटलेल्या ओठावर (Cracked Lips) मध हे रामबाण उपाय आहे. कारण मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म असतात ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. मधाने तुम्ही तुमच्या ओठातील भेगाही भरून काढू शकता. बोटावर मध घेऊन ओठांवर लावा आणि तासभर राहू द्या. यानंतर ओठ धुवा. असे केल्याने तुमचे ओठ गुलाबी आणि मुलायम होतील.


गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध


मूठभर गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि त्या एका कप कच्च्या दुधात काही तास भिजवा. आता भिजवलेल्या पाकळ्या बारीक करून पेस्ट बनवा, आता ही पेस्ट दिवसातून तीनदा ओठांवर (Cracked Lips) लावा. याचा रोज वापर केल्याने तुमच्या ओठांची डेड स्किन निघून जाते आणि फाटलेल्या ओठांपासूनही आराम मिळतो.


एलोवेरा जेल


एलोवेरा जेलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत, म्हणून जर तुमचे ओठ फाटलेले असतील तर तुम्ही तुमच्या ओठांवर (Cracked Lips)कोरफड वेरा जेल लावू शकता, याचा वापर केल्याने तुमचे ओठ मऊ होतील.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)