How ot Make Cake Without Oven : सगळीकडे सध्या नाताळचा उत्साह पाहायला मिळतोय डिसेंबर  महिना म्हणजे सर्वाना हवाहवासा महिना, सगळीकडे ख्रिसमचे वारे वाहू लागतात , बच्चे कंपनीला तर नाताळ बाबा म्हणजेच सांताक्लॉस  चॉकलेट, केक आणि मिळणारे गिफ्ट्स या सर्वांचं फारच अप्रूप असतं.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

kitchen tips how to make cake : ख्रिसमसध्ये (cristmas 2022) आणखी एक महत्वाची आणि आवर्जून येते अशी गोष्ट म्हणजे केक ! नाताळमध्ये  केकला विशेष महत्व असतं .भारत खऱ्या अर्थाने विविधतेने नटलेला देश आहे प्रत्येक धर्माचे सण समारंभ इथे आपण सर्वच मोठ्या उत्साहात साजरे करतो. नाताळचे त्याचसोबत येणाऱ्या नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी केक आवर्जून बनवला जातो किंवा ऑर्डर केला जातो पण केक हवाच ! (how to make cake at home) बाजारात अश्या वेळी मिळणारे केक्स खूप महाग असतात शिवाय त्यात जास्त प्रमाणात मैदा वापरला जातो त्यामुळे तो आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक सुद्धा असतो. (healthy cake at home recipe)


हल्ली बाजारात कप केक ची मागणी खूप वाढू लागली आहे, बच्चे कंपनीला हा मग केक फारच भुरळ घालताना दिसत आहे, अश्या वेळी बाजारातला मैद्याने बनलेला केक लहान मुलाना देण्यापेक्षा घरीच बनवूया गव्हाच्या पिठाचा स्पॉंजी आणि टेस्टी मग केक (homemadeChocolate Mug Cake Recipe) 


साहित्य


  • दही - पाव कप

  • गूळ - पाव कप

  • तूप/तेल - २ चमचे

  • गव्हाचे पीठ - अर्धा कप

  • कोको पावडर - 1 मोठा चमचा 

  • बेकिंग पावडर - अर्धा चमचा 

  • बेकिंग सोडा -  चिमूटभर

  • दूध - गरजेनुसार 

  • चॉकलेट्स - गरजेनुसार


कृती


हा स्वादिष्ट मग केक बनवण्यासाठी सर्वप्रथम दही , गव्हाचं पीठ, गुल आणि बेकिंग पावडर एकतर करा यात कोको पावडर , बेकिंग सोडा, तेल आणि दूध घाला हे सर्व जिन्नस एका भांड्यात व्यवस्थितपणे एकञ करा. आता एकजीव होईपर्यंत फेटून घ्या, चांगलं फेटून झाल्यावर त्यात चॉकलेटचे तुकडे घाला. 


आता हे तयार झालेलं मिश्रण एका सिरॅमिक कप मध्ये भरा. पण त्यापूर्वी कप ला हलकासा बटर लावून ग्रीस करून घ्या.  मिश्रण भरलेला कप मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये 180 डिग्री वर 8 मिनिटं व्यवस्थित बेक होऊद्या, 



(video credit  - @cooking_with_aarti)


8 मिनिटानंतर केक बेक होऊन तयार. थंड करून घ्या त्यावर वरून लिक्विड चॉकलेट घाला स्प्रिंकल्स आणि इतर वस्तुंनी सजावट करून घ्या आणि घरात सर्वाना खाऊ घाला यम्मी कपकेक ! (cristmas cake)


तयार मिश्रण कपात भरून बेक करून घ्या. केक बेक झाल्यानंतर त्यावर लिक्विड चॉकलेट एड करा. तयार आहे सॉफ्ट, स्पॉजी मग केक.