वजन कमी करण्यासाठी `या` वेळेत जरुर रडा
आता `आय हेट टिअर्स नव्हे`, तर `आय लव्ह टिअर्स`
मुंबई : आपल्या आजुबाजुचा एखादा व्यक्ती जर रडत असेल तर त्या व्यक्तीस पहिला प्रश्न असतो तो म्हणजे का रडत आहात? मानसिक स्थिती, वर्तवणुकीतील बदल, कधी नैराश्य तर कधी अतिउत्साहीपणा अशा अनेक कारणांमुळे माणसांच्या डोळ्यांमध्ये आपसूक पाणी येते. पण तुम्हाला ठाऊक आहे का?, रडणं आरोग्यास एक प्रकारे लाभदायक सुद्धा ठरू शकतं. 'AsiaOne'ने सादर केलेल्या अहवालात रडण्यामुळे वजन कमी होते, असे स्पष्ट करण्यात आलं आहे.
जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या शरिरात कॉर्टिसोल हार्मोन बाहेर सोडले जातात. शरीरातील हे वाढीव कर्टिसोल हार्मोन्स शरिरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. तसेच, तणावग्रस्त अश्रू आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात, जे वजन कमी करण्यासाठी फार फायद्याचे ठरते. असे कित्येक लोक असतात की त्यांना सहजपणे रडता येत नाही. त्यामुळे रडण्याचे फायदे आणि त्यामागील भावना अनुभवणे त्यांच्यासाठी कठीण होऊ शकते.
तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण रडण्याचे सुद्धा प्रकार अहेत असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रडण्याचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. 'बेसल', 'रिफ्लेक्स' आणि 'मानसिक अश्रू'. आपल्या डोळ्यांना ओलसर ठेवण्याचे काम 'बेसल' अश्रू करतात. धूळ किंवा प्रदूषण यांपासून सुरक्षित ठेवण्याचे काम 'रिफ्लेक्स' अश्रू करतात. त्याचबरोबर मानसिक आश्रू वास्तविक भावना आणि मानवी भावनांसह जोडलेले असतात. मानसिक आश्रूंमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा आपल्या शरीरातील चरबी प्रत्येक तासाला वाढत असते. आपण भावनिकरित्या तणावग्रस्त असतो तेव्हा आपले हृदयाची गती वाढते. त्यामुळे सायंकाळी ७ ते १० वाजण्याच्या वेळेदरम्यान रडल्यास वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे यापुढे 'आय हेट टिअर्स....' म्हणण्यापेक्षा 'आय लव टिअर्स' म्हणा आणि तुम्हाला कधी रडायला येत असेल तर आश्रू थांबवू नका त्यांना वाहू द्या.