मुंबई : रोज केल्या जाणाऱ्या दारुच्या अतिसेवनानं त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका बळावतो, असं नुकतंच एका अध्ययनातून समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या 'हार्वर्ड टी एच चैन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ'च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनानुसार, दारुच्या सेवनामुळे नॉन मेलोनोमा त्वचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. 'नॉन मेलोनोमा त्वचा कॅन्सर' त्वचेच्या वरच्या भागावर आढळतो.


अति दारू पियाल्याने बेसल सेल कार्सिनोमा (बीसीसी) आणि स्किन स्क्वमस सेल कार्सिनोमा (सीएससीसी) चा धोका ११ टक्क्यांपर्यंत वाढतो. याचे संशोधन त्वचातज्ज्ञ ब्रिटीश जनरलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.  


नॉन मेलोनोमा (एनएमएससी) श्रेणीत त्वचेच्या अनेक प्रकारच्या कॅन्सरचा समावेश होतो. यामध्ये बेसल सेल कार्सिनोमा (बीसीसी) आणि त्वचीय स्क्वैमस सेल कार्सिनोमा (सीएससीसी) चं प्रमाण अधिक आहे. अध्ययनात विद्यार्थ्यांनी एनएमएससीचे एकूण ९५,२४१ प्रकारणांचा अभ्यास केला गेला. यामध्ये या प्रकारच्या कॅन्सरचे १३ प्रकारणं आढळी.  


 हे अध्ययन 'जर्नल ऑफ डर्मेटॉलॉजी'मध्ये प्रकाशित करण्यात आलंय.