चेन्नई : तामिळनाडूतील चेन्नईच्या एका सरकारी रूग्णालयात आठ महिन्यांची गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गर्भपात करण्यासाठी तिने गोळ्या घेतल्या आणि त्यामुळे तिचा जीव गेल्याची माहिती आहे. मूळची ओडिशाची, कुमारी कंजाका तिचा पती प्रताप उलका आणि भाची गीता कंजाका यांच्यासोबत राहत होती.


प्रसूतीमध्ये होणाऱ्या वेदनांमुळे होती त्रस्त होती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी सांगितले की, ही महिला काही दिवसांपूर्वी तिच्या भाचीसह तिच्या एका नातेवाईकाच्या अंतिम संस्कारासाठी ओडिशात गेली होती. ज्या महिलेचा गर्भधारणेदरम्यान गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला होता. तेथून परत आल्यानंतर ती महिला अस्वस्थ झाली आणि तणावात राहू लागली.


औषधांमुळे गर्भाशयात झाला संसर्ग


एका वेबसाईटच्या अहवालानुसार, 20 सप्टेंबर रोजी चेन्नईला पोहोचल्यानंतर ती बाथरूममध्ये घसरली आणि काही दिवसांनी ओटीपोटात दुखण्याची तक्रार जाणवली. यानंतर, कुटुंबातील सदस्यांनी महिलेला किलपॉक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं.


डॉक्टरांनी तपासानंतर सांगितलं की, तिच्या गर्भाशयात संसर्ग आहे आणि गर्भाशय काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु असं असूनही ती सावरली नाही आणि तिचा मृत्यू झाला.


पोस्टमार्टम दरम्यान झाला खुलासा


महिलेच्या मृत्यूनंतर, पोस्टमार्टमचा अहवाल आणि कुटुंबीयांच्या चौकशीनंतर अस आढळून आले की तिने गर्भपात करण्यासाठी गोळ्या घेतल्या होत्या. 


डॉक्टरांनी सांगितलं की, कुमारी कंजाकाच्या कुटुंबीयांनी त्यांना सांगितलं की तिने गर्भपातासाठी औषध घेतलं होतं. गर्भपातासाठी औषधं घेणं आणि तेही सातव्या महिन्यात ते अत्यंत धोकादायक असू शकतं. गर्भपात झाल्यानंतर, गर्भाशय नाजूक होऊ शकतं आणि गोळ्या त्याची परिस्थिती खराब करू शकतात.