मुंबई : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा पाचवा अहवाल प्रसिद्ध केलाय. यामध्ये आरोग्य मंत्रालयाने भारतातील 28 राज्यं, 8 केंद्रशासित प्रदेश, 707 जिल्ह्यांमधील सुमारे 6.37 लाख घरांचं सर्वेक्षण केलं. या अहवालानुसार, देशातील प्रजनन दरामध्ये घट झाला असून तो 2.2% वरून 2% वर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय महिलांच्या प्रजनन क्षमत दरात घट झाल्याची आकडेवारी समोर आलीय. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही आकडेवारी उघड झालीये. एक महिला तिच्या आयुष्यात सरासरी किती मुलांना जन्म देते याची आकडेवारी म्हणजे प्रजनन क्षमता दर. अहवालानुसार, मुस्लिम समाजातल्या महिलांच्या प्रजनन क्षमतेचा दर सर्वात कमी आहे.


या सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार, केवळ 5 राज्यं म्हणजे बिहार, मेघालय, उत्तर प्रदेश, झारखंड आणि मणिपूर याठिकाणी प्रजनन दर 2.1 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 


आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण जाहीर केले. या अहवालात असंही म्हटलं आहे की, बहुतेक नोकरदार महिला गर्भनिरोधक वापरण्यावर विश्वास ठेवतात. भारतातही गर्भनिरोधकांचा वापर वाढल्याचं दिसून आलंय. 2015 मध्ये 54% लोकांनी गर्भनिरोधकांचा वापर केला होता, तर 67% लोक आता गर्भनिरोधक पद्धती वापरत आहेत.


महिला होतात स्थूलतेच्या शिकार


भारतामध्ये 2015-16 च्या सर्वेक्षणात 21 टक्के स्त्रिया लठ्ठ होत्या, तर यंदाच्या सर्वेक्षणात 24 टक्के महिला लठ्ठ असल्याचं समोरं आलं आहे. पुरुषांमध्ये हा आकडा 19 टक्क्यांवरून 23 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.