महिलांनो सांभाळा; कमी पाणी पिणं तुमच्या सेक्स लाईफवर करतंय परिणाम
सेक्स ड्राईव्ह कमी होणं हे आरोग्यासोबतच तुमच्या नात्यासाठी देखील हानिकारक ठरू शकतं.
मुंबई : महिलांमध्ये अनेकदा सेक्स ड्राईव्हचा अभाव दिसून येतो. सेक्स ड्राईव्ह कमी होणं हे आरोग्यासोबतच तुमच्या नात्यासाठी देखील हानिकारक ठरू शकतं. शिवाय या सर्वांचा मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही परिणाम होतो. मात्र असं का होतं याचा कधी तुम्ही विचार केलाय का? याचा संबंध डिहायड्रेशनशी असू शकतो.
तुम्हाला हे ऐकून फार आश्चर्य वाटेल की, तुम्ही जितकं पाणी पिता त्यामुळे तुमच्या सेक्स ड्राईव्हवर प्रभाव पडतो. डिहायड्रेशन तुमच्या लैंगिक आरोग्यवर विपरीत परिणाम करू शकतं.
डिहायड्रेशनचा परिणाम कसा होतो?
केवळ उन्हाळ्याच्या दिवसांत नव्हे तर थंडीच्या दिवसांत देखील हायड्रेट राहणं गरजेचं आहे. शरीराला पुरेसं पाणी मिळालं नाही की डिहायड्रेशनची समस्या बळावू शकते. आणि जर डिहायड्रेशन झालं तर तुम्ही कोणतंही काम योग्य पद्धतीने करू शकत नाही.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, डिहायड्रेशन हे महिला आणि पुरुष या दोघांच्या शरीरात अनेक बदल घडवून आणतात. जसं की, थकवा, जळजळ, इरेक्टाईल फंक्शन इत्यादी. त्याचप्रमाणे महिलांना सेक्स दरम्यान योनिमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे डिहायड्रेशन तुमच्या सेक्स लाईफमध्ये मोठा अडथळा बनू शकतं.
लैंगिक इच्छेवर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. याचं नेमकं कारण समजून घेण्यास वेळ लागू शकतो. यावेळी शरीरातील पाण्याच्या कमतरतेकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे महिलांना हायड्रेट राहण्यावर भर दिला पाहिजे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.