फ्रान्स : देशात कोरोना व्हायरसची प्रकरणं कमी होत असल्याचं दिसून येतंय. मात्र अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेकडून एक चिंतेत भर घालणारी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की, कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट मिळून नवा व्हायरस तयार झाला आहे. आणि याचा पुरावा देखील सापडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHOच्या म्हणण्याप्रमाणे, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट मिळून नवा व्हेरिएंट तयार होणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. 


जानेवारी 2022 पासून व्हायरस पसरण्यास सुरुवात


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, डेल्टा आणि ओमायक्रॉनमुळे तयार झालेला व्हायरस किती धोकादायक आहे याबाबत अजून अभ्यास सुरु आहे. मिडीया रिपोर्टसच्या माहितीप्रमाणे, फ्रान्समध्ये जानेवारी 2022 मध्ये वहा व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली होती. 


WHO म्हणतं की, ओमिक्रॉन आणि डेल्टाचा रिकॉम्बिनंट व्हायरस पसरतोय. WHO शास्त्रज्ञ मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी ट्विट केलंय की, SARSCov2 चे ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंट एकत्र पसरण्याची शक्यता आहे. त्यांचं सर्कुलेशन जलद असू शकतं. आम्ही त्याबाबत माहिती घेत आहोत आणि त्यावर चर्चाही सुरू आहे.


मारिया यांनी वायरोलॉजिस्ट jeremy kamil यांचं ट्विट रिट्विट केलं आहे. यावेळी मारिया यांनी म्हटलंय की, डेल्टा आणि ओमायक्रॉन मिळून व्हायरसचे  पुरावे सापडले आहेत. फ्रान्समध्ये जानेवारी 2022 पासून त्याचा प्रसार होतोय. त्याच प्रोफाइलचे व्हायरस डेन्मार्क आणि नेदरलँडमध्येही सापडले आहेत. 


दरम्यान WHO ने पत्रकार परिषदेत सांगितले की, हा व्हायरस धोकादायक असल्याचा कोणताही ठोस पुरावा अजून मिळालेला नाही.