Corona Delta Varient : कोरोना डेल्टा व्हेरियंटबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी
Corona Delta Varient : डेल्टा व्हेरिएंटबाबत महत्त्वाची आणि सर्वसामांन्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबई : कोरोनामुळे 2-3 वर्षांत (Corona Virus) अनेक जण आपल्यातून निघून गेले. अनेकांनी आपले नातेवाईक गमावले. यासह कोरोनामुळे आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला. कोरोना सरतो न सरतो तोवर कोरोनाचे अनेक व्हेरिएंटही समोर आले. त्यामुळे सर्वसामांन्यामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. मात्र आता या डेल्टा व्हेरिएंटबाबत (Corona Delta Varient) महत्त्वाची आणि सर्वसामांन्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. (delta variant of corona expelled from maharashtra discover information from genome sequencing)
कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट राज्यातून हद्दपार झाल्याची माहिती समोर आली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगमधून ही माहिती उघड झाली आहे. दुस-या व्हेरियंटला कारणीभूत ठरलेला डेल्टा हद्दपार झालाय. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी ही दिलासादायक बाब आहे.
राज्यात दिवसभरात किती पॉझिटिव्ह?
दरम्यान राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 913 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 हजार 685 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे.